ठाणे : ठाण्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार बदल घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडत आहे. राष्ट्रवादीचे माजी आणि जेष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे यांच्यासह, अनेक माजी नगरसेविकांनी आणि दिवागंत नेते सुधाकर चव्हाण याच्या पत्नीने रवीवारी बाळासाहेबांच्या शिवसेनेत भव्य पक्ष प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी ये तो सिर्फ झाकी है, ठाणे के बाद अगला स्टेशन बाकी है असे म्हणत एकप्रकरे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड त्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. तर काही लोक स्वतःला क्लास लीडर समजतात, पण हनुमंत जगदाळे तुम्ही खाऱ्य अर्थाने मास लीडर असल्याचा उल्लेख यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
क्लास लीडरने दुर्लक्ष्य केल्यामुळेच असे मास लीडर तुमच्यातुन गेले. असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला. ठाण्यात रविवारी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते हणमंत जगदाळे यांच्या गटाने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बाळासाहेबाच्या शिवसेनेत जाहिर प्रवेश केला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी लोकमान्य नगरमध्येही क्लस्टरच्या माध्यमातुन विकास केला जाईल.असे वचन जाहिररीत्या दिले.
शिंदे गटाला ठाण्यात प्रबळ नेता मिळाला: ठाण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची शकले होण्याची सुरुवात झाली आहे. यापुर्वी नजीब मुल्ला यांच्या वाढदिवशी लागलेल्या बॅनरनतर, डझनभर नगरसेवक राष्ट्रवादीला सोडचिठठी देणार असल्याची भाकिते केली गेली होती. त्यातील पहिल्या चार नगरसेवकांनी अखेर राष्ट्रवादीला अखेरचा रामराम केला. लोकमान्य नगर परिसरातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक हणमंत जगदाळे व त्यांचे सहकारी माजी नगरसेवक राधाबाई जाधवर, दिंगबर ठाकुर, वनिता घोगरे यांच्यासह परिवहनचे माजी सदस्य संतोष पाटील, ब्लॉक अध्यक्ष सुधाकर नाईक, माजी नगरसेवक संभाजी पंडीत, युवा पदाधिकारी प्रशांत जाधवर, संदीप घोगरे आणि दिवंगत ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्या पत्नी सुलेखा चव्हाण आदींनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. एक अभ्यासू आणि जेष्ठ नगरसेवक म्हणुन त्यांची ओळख असुन त्यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाला ठाण्यात प्रबळ नेता मिळाला आहे.
ठाण्याच्या विकासासाठी शिंदेना पाठींबा: अनेक मुख्यमंत्री पाहिले, पण लोकांमधला, लोकांसाठी काम करणारा आणि गरीबांची जाण असलेला मुख्यमंत्री म्हणुन एकनाथ शिंदेकडे पाहिले जाते. तेव्हा, ठाण्याच्या विकासासाठी शिंदेना पाठींबा द्या. असे आवाहन तब्बल ५० वर्षे काँग्रेसी विचारधारा जोपासणाऱ्या हणमंत जगदाळे यांनी केले. भविष्यात ठाण्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेचाच भगवाच फडकणार असल्याचे भाकित त्यांनी केले.