ठाणे - अतिवृष्टीमुळे ठाण्यातील लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र, दुसरीकडे आता ठाण्यात पहिल्यांदाच खाजगी स्वरूपात गृहसंकुलनात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ठाण्यातील एव्हरेस्ट वर्ल्ड या गृहसंकुलांत ही सुरूवात करण्यात आलेली आहे. भाजपाचे आमदार संजय केळकर यांच्यावतीने संस्कार सेवाभावी संस्था तसेच भाजपा पदाधिकारी आयोजक अल्केश कदम यांच्या पुढाकाराने ही लस देण्यात येत आहे.
खाजगी तत्वावर लस
एकीकडे ताटकाळत रांगेत उभे राहणाऱ्यांसाठी कुठेतरी अशा प्रकारे लस मिळत असल्याने दिलासा मिळत आहे. त्याचबरोबर १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना शासनाकडून लस देणे बंद केल्याने दुसरीकडे खाजगी तत्वावर ही लस आता त्यांना देखील लस मिळाल्यामुळे दिलासा मिळत आहे.
कमी किंमतीत लस
काही ठिकाणी या लसींची किंमत 1 हजार रुपयांपर्यंत आहे. या किंमतीवर सरकारी अंकुश असणे गरजेचे आहे. नाहीतर या लसीच्या माध्यमातून नागरिकांची लूट होऊ शकते. मात्र, या ठिकाणी ही लस ७८० रुपये मध्ये मिळत आहे. मात्र, इतर ठिकाणी ही लस एक हजार ते बाराशे रुपयात मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.