ETV Bharat / state

ठाणे शहरासाठी वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पास मंत्रीमंडळाची मान्यता - मेट्रो रेल्वे

ठाणे - शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास राज्य मंत्रीमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली आहे. यामुळे ठाण्यातील दाट वस्तीच्या भागातील वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Mar 6, 2019, 12:06 AM IST

ठाणे - शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास राज्य मंत्रीमंडळाने मंगळवारी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली. ठाण्यातील दाट वस्तीच्या भागातील वाहतुकीची समस्या सुटण्यास यामुळे मदत होईल, असा विश्वास ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे

शहर आणि परिसरातील वाहतुकीची वाढती गरज भागविण्यासाठी कॉम्प्रीहेन्सिव मोबिलिटी प्लान तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये जलद वाहतूक प्रणाली म्हणून ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रणालीची शिफारस करण्यात आली. त्यानुसार महानगरपालिकेने या मेट्रो मार्गिकेचा सविस्तर प्रकल्पदेखील मंजूर केला आहे. या अहवालास आता शासनानेही मान्यता दिली आहे.

शहर अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्प हा नवीन ठाणे ते ठाणे या दरम्यान २९ किमी अंतराचा असेल. यामध्ये २० उन्नत तर २ भुयारी अशी एकूण २२ स्थानके असतील. सुमारे १३ हजार ९५ कोटींच्या या प्रकल्पामुळे २०२५ मध्ये दररोज ५ लाख ७६ हजार तर २०४५ मध्ये दररोज ८ लाख ७२ हजार प्रवाशांची वाहतूक करणे शक्य होणार आहे. नवीन ठाणे, रायला देवी, वागळे चौक, लोकमान्य नगर बस डेपो, शिवाई नगर, नीलकंठ टर्मिनल, गांधीनगर, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजय नगरी, वाघबिळ, वॉटर फ्रंट, पाटलीपाडा, आझादनगर बस स्थानक, मनोरमा नगर, कोलशेत औद्योगिक क्षेत्र, बाळकुम नाका, बाळकुम पाडा, राबोडी, शिवाजी चौक, ठाणे स्टेशन ही स्थानके यामध्ये प्रस्तावित आहेत.

शहरातील सर्व मेट्रो मार्गिकांच्या दरात एकवाक्यता राहावी म्हणून वर्तुळाकार मेट्रोचे दर हे मेट्रो ४ वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली या मार्गिकेनुसार राहणार आहेत. या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महामेट्रो) मार्फत करण्यात येईल. तसेच, हा प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प आणि महत्त्वपूर्ण नागरी प्रकल्प म्हणून घोषित करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. हा प्रकल्प लवकर पूर्ण होण्यास मदत होणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

undefined

Intro:

ठाणे शहरासाठी वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पास मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई 5

ठाणे शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ठाणे शहरातील वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. ठाण्यातील दाट वस्तीच्या भागातील वाहतुकीची समस्या यामुळे सुटण्यास मदत होईल, असा विश्वास ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
ठाणे शहर व परिसरातील वाहतुकीची वाढती गरज भागविण्यासाठी कॉम्प्रिहेन्सीव्ह मोबिलिटी प्लान तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये जलद वाहतूक प्रणाली म्हणून ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रणालीची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार ठाणे महानगरपालिकेने या मेट्रो मार्गिकेचा सविस्तर प्रकल्पदेखील मंजूर केला. या अहवालास आता शासनानेही मान्यता दिली आहे.
ठाणे शहर अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्प हा नवीन ठाणे ते ठाणे या दरम्यान 29 किमी अंतराचा असेल. यामध्ये 20 उन्नत तर 2 भूयारी अशी एकूण 22 स्थानके असतील. सुमारे 13 हजार 95 कोटींच्या या प्रकल्पामुळे 2025 मध्ये दररोज 5 लाख 76 हजार तर 2045 मध्ये दररोज 8 लाख 72 हजार प्रवाशांची वाहतूक करणे शक्य होणार आहे. नवीन ठाणे, रायला देवी, वागळे चौक, लोकमान्य नगर बस डेपो, शिवाई नगर, नीलकंठ टर्मिनल, गांधीनगर, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह,मानपाडा, डोंगरीपाडा, विजय नगरी, वाघबिळ, वॉटर फ्रंट, पाटलीपाडा, आझादनगर बस स्थानक, मनोरमा नगर, कोलशेत औद्योगिक क्षेत्र, बाळकुम नाका, बाळकुम पाडा, राबोडी, शिवाजी चौक, ठाणे स्टेशन ही स्थानके यामध्ये प्रस्तावित आहेत. ठाणे शहरातील सर्व मेट्रो मार्गिकांच्या दरात एकवाक्यता रहावी म्हणून वर्तुळाकार मेट्रोचे दर हे मेट्रो ४ वडाळा-घाटकोपर-मुलूंड-ठाणे-कासारवडवली या मार्गिकेनुसार राहणार आहेत. या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महामेट्रो) मार्फत करण्यात येईल. तसेच, हा प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प व महत्त्वपूर्ण नागरी प्रकल्प म्हणून घोषित करण्यासही मान्यता देण्यात आली असल्याने हा प्रकल्प लवकर पूर्ण हिन्यास मदत होणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. .Body:......Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.