ठाणे - कटरच्या साहाय्याने बँकेचे एटीएम कापून त्यामधील लाखोंच्या रक्कमेवर चोरांनी डल्ला मारला आहे. ही घटना कल्याण-मुरबाड महामार्गावरील म्हारळ गावातील आयसीआयसीआय बँकेबाहेर घडली आहे. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरक्षा रक्षकासारखे कपडे घालून केली चोरी
कल्याण-मुरबाड महामार्गावरील म्हारळ गावातील विठ्ठल नगरमध्ये आयसीआयसीआय बँक आहे. या बँकेच्या बाहेरच एटीएम आहे. अज्ञात चोरट्यांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास सुरक्षा रक्षकासारखे कपडे घालून ही चोरी केली आहे. हे एटीएम गॅस कटरच्या साहयाने कापले. त्यानंतर त्यामधील रोकड लंपास केली आहे. काही दिवसांपूर्वीही रायते गावात याच महामार्गावर आठ दुकाने चोरटयांनी फोडली होती.
चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद
हा एटीएम फोडून पैसे चोरी करण्याचा प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पहाणी केली. दरम्यान, पुठील तपासाठी इमारतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही ताब्यात घेतले आहेत. मात्र, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच, कोरोना काळात चोरांची हिम्मत वाढल्याचे दिसून येत असल्याची चर्चा रंगली आहे. या गुन्ह्याचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भोई आणि साहय्यक पोलीस निरीक्षक आर. पी. पवार यांच्या पथका मार्फत होत आहे.