ETV Bharat / state

डोंबिवलीच्या औषध निर्माण कंपनीत स्फोट; दोन कामगार दगावल्याची भीती

सांगाव मानपाडा रोड येथे औषध निर्माण कंपनीत वातानुकुलीन यंत्रात (एसी) बिघाड होऊन अचानक स्फोट झाला.

डॉर्टमुंड लॅबोरेटरीज प्रा. लि
author img

By

Published : Apr 28, 2019, 7:28 AM IST

ठाणे - औषध निर्माण कंपनीत वातानुकुलीन यंत्रात (एसी) बिघाड होऊन अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन कामगार मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही दुर्घटना सांगाव मानपाडा रोड येथे शनिवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली. घटनेनंतर आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. कमलेश यादव आणि गिरीधर यादव अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

डॉर्टमुंड लॅबोरेटरीज प्रा. लि. ही कंपनी डोंबिवली एमआयडीसीच्या फेज २ मधील प्लॉट नं. ए १ येथे आहे. या कंपनीत औषध निर्मिती करण्यात येते. कंपनीमध्ये वातानुकुलीन यंत्रात बिघाड होऊन अचानक स्फोट झाला. या स्फोटात दोन कामगार जबर जखमी झाले. या कामगारांना तत्काळ खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, हे कामगार दगावल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली. यासंदर्भात अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, आवाजाने आसपासचे रहिवासी आणि दुकानदार भयभीत झाले होते.

पोलीस उपनिरीक्षक दिलीप तायडे माहिती देताना म्हणाले, सदर कंपनीच्या तिसऱ्या मजल्यावरील वातानुकुलीन यंत्रातील 'कॉम्प्रेसर'मध्ये खासगी ठेकेदारामार्फत गॅस भरण्याचे काम सुरू होते. मात्र, घटनास्थळावर अधिक माहिती देण्यास कुणीही तयार नसल्याचे पोलीस उपनिरीक्षक तायडे यांनी सांगितले.

डोंबिवलीच्या औषध निर्माण कंपनीत स्फोट; दोन कामगार दगावल्याची भिती

ठाणे:- मानपाडा रोडला सांगाव येथिल औषध निर्माण करणाऱ्या एका कंपनीत  एअरकंडिशनच्या कॉम्प्रेसरचा अचानक स्फोट झालेल्या दुर्घटनेत दोन कामगार मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही दुर्घटना शनिवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास घडल्याने आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कमलेश यादव आणि गिरीधर यादव अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

  डॉर्टमुंड लॅबोरेटरीज प्रा. लि. ही कंपनी डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मधील प्लॉट नं. ए 1 येथे कार्यरत आहे. या कंपनीत औषध निर्मिती करण्यात येत आहे. एअरकंडिशनच्या कॉम्प्रेसरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात दोन कामगार जबर जखमी झाले. या कामगारांना तात्काळ निवासी विभागातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र हे कामगार दगावल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली. मात्र यासंदर्भात अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. या स्फोटाची तीव्रता इतकी शक्तिशाली होती की आवाजाने आसपासचे रहिवासी आणि दुकानदार भयभीत झाले होते. फौजदार दिलीप तायडे माहिती देताना म्हणाले, सदर कंपनीच्या तिसऱ्या मजल्यावरील एअरकंडिशनच्या कॉम्प्रेसरमध्ये खासगी ठेकेदाराच्यामार्फत गॅस भरण्याचे काम सुरू होते. मात्र घटनास्थळावर अधिक माहिती देण्यास कुणीही तयार नसल्याचे फौजदार तायडे यांनी सांगितले. 

I’m protected online with Avast Free Antivirus. Get it here — it’s free forever.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.