ETV Bharat / state

Police Officer Inquiry : भाजप अध्यक्ष विनयभंग प्रकरण; पोलीस अधिकाऱ्याच्या मागे ईडी, सीबीआयचा ससेमिरा... - BJP President molestation case

डोंबिवली पूर्व भाजपचे अध्यक्ष नंदू जोशी यांनी एका महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा शिंदे गटाच्या नेत्यांमुळे दाखल केल्याचा समज भाजपच्या स्थानिक नेत्यांनी करत, मानपाडा पोलीस ठाण्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या बदलीच्या मागणीसाठी भाजपने मोर्चा काढला होता. तसेच या पोलीस अधिकाऱ्याच्या संपत्तीची ईडी, सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली.

Police Officer Inquiry
भाजप पीसी
author img

By

Published : Jun 11, 2023, 10:28 PM IST

भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले मनोगत मांडताना

ठाणे: मानपाडाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे हे मुख्यमंत्री शिंदे यांचे नजीकचे असल्याने त्यांची बदली अद्यापही झाली नाही. त्यामुळे भाजप-शिंदे गटात राजकीय तणाव निर्माण झाला. आता तर भाजपच्या नेत्यांनी शेखर बागडे यांच्या बेनामी मालमत्तेविषयी ईडी आणि सीबीआयकडे चौकशीची मागणी करत त्यांच्या मागे ईडी, सीबीआयचा ससेमिरा लागणार असल्याचे संकेत दिले आहे.

तक्रारीची दखल नाही: नंदू जोशी यांच्यावर गुन्हा दाखल होण्यापूर्वी भाजपचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी मानपाडा पोलीस ठाण्याच्या वर्तणुकीबाबत पोलीस वरिष्ठांकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र त्यांच्या तक्रारीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कारवाई केली नसल्याचे त्यांनी सांगत उलट भाजपचे डोंबिवली शहराध्यक्ष नंदू जोशी यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्यांचे नाव कसे बदनाम होईल, असे कारस्थान रचल्याचा आरोप कांबळे यांनी यापूर्वी केला आहे.

कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता: गेल्या ६ महिन्यांपासून पोलीस अधिकारी बागडे यांच्या संपत्तीची माहिती गोळा करून शेखर बागडे व त्यांच्या कुटुंबाच्या नावे 50 ते 60 कोटीहून अधिक रुपयाची बेहिशोबी मालमत्ता असल्याचे दस्तावेज गोळा केले. आता हे दस्तावेज ईडी आणि सीबीआयकडे देऊन बागडेंची चौकशी करण्यासाठी संपर्क केल्याचे भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजगुले यांनी आज डोंबिवली पूर्वेतील भाजपच्या कार्यलयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. एकंदरीतच भाजपने जोशी यांच्या बचावासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

काय आहे नंदू जोशी प्रकरण? पीडित ४८ वर्षीय महिला ही पोलीस अधिकाऱ्याची पत्नी असून ती पतीपासून विभक्त राहते. पीडिता २०१८ सालापासून पतीपासून फारकत घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यातच ही महिला राहत असलेले घर खाली करण्यासाठी नंदू जोशी हे २०१८ पासून एप्रिल २०२३ पर्यंत वारंवार तिच्या घरी जाऊन शारीरिक सुखाची मागणी करत होते, असे पीडित महिलेने मानपाडा ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पती- पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद सुरू आहे. त्यातच नंदू जोशी हे पीडितेच्या पतीचे मित्र असून पोटगी रक्कम देण्यासाठी नंदू हे महिलेच्या घरी जात होते. त्याच दरम्यान त्यांनी हे कृत्य केल्याचे बुधवारी ३१ मे रोजी पीडितेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. तर गुन्हा दाखल असलेले नंदू जोशी हे डोंबिवलीचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून राजकीय वर्तुळात ओळखले जातात.

हेही वाचा:

  1. Subhash Deshmukh : 'लोकं म्हणतात दारुविक्रीत माझा हात'.. भाजप आमदाराने भरसभेत लावला पोलीस अधिकाऱ्याला फोन
  2. Eknath Shinde Meet With JK LG : जम्मू काश्मीरमध्ये उभारणार महाराष्ट्र भवन, एकनाथ शिंदेंनी मागितली राज्यपालांकडे जागा
  3. बदनामी प्रकरणी नितेश राणे विरोधात संजय राऊत न्यायालयात, अब्रुनुकसानीचा दावा शिवडी न्ययालयात दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.