ETV Bharat / state

आमदारच्या कार अपघातात २ जणांच्या मृत्यू प्रकरणी वाहन चालकाची जामिनावर मुक्तता - ठाणे अपघात न्यूज

दहागाव जवळ भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या मालकीची असलेल्या कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वारसह एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणी कल्याण तालुका ग्रामीण पोलिसांनी आमदारांचा कार चालक असलेल्या आरोपीला अटक केली. मात्र सोमवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता काही तासातच त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

BJP MLA's car hits two-wheeler 2 dead case, car Driver released on bail
आमदारच्या कार अपघातात २ जणांच्या मुत्यू प्रकरणी वाहन चालकाची जामिनावर मुक्तता
author img

By

Published : Dec 15, 2020, 12:41 AM IST

ठाणे - कल्याण तालुक्यातील दहागाव जवळ भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या मालकीची असलेल्या कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वारसह एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी कल्याण तालुका ग्रामीण पोलिसांनी आमदारांचा कार चालक असलेल्या आरोपीला अटक केली. मात्र सोमवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता काही तासातच त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. किरण भोपी (वय. २९) असे कार चालकाचे नाव आहे.

कार आणि मोटारसायकलमध्ये जोरदार धडक
रविवारी संध्याकाळीच्या सुमारास दहागाव नजीक आमदार किसन कथोरे यांच्या कार आणि मोटारसायकलमध्ये जोरदार धडक झाली. या धडकेत कल्याण मधील पिसवली परिसरात राहणारा मोटारसायकलस्वार अमित नंदकुमार सिंग व त्यांच्या सबोत असलेली तरूणी सिमरन सिंग या दोघांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला होता.

भाजपा आमदार किसन कथोरे बोलताना...
आमदारांच्या व्हायरल बाईटमुळे नटेकऱ्यांमध्ये नाराजी
अपघात होताच तासाभरात भाजपा आमदार किसन कथोरे यांनी मोबाईलवर बाईट देऊन, तो मतदारसंघातील कार्यकर्त्यांना पोस्ट केला होता. त्यामध्ये आमदार स्वतःला आपण आपल्या आशीर्वादाने सुखरुप असून केवळ कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सांगितले. मात्र या भीषण अपघात ठार झालेल्या त्या तरुण व तरुणी बद्दल सहानभूती तर सोडा केवळ ते दोघे जखमी झाल्याचे आमदारांनी व्हायरल बाईटमध्ये प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे मिनिटांतच शेकडो व्हाट्सअप ग्रुप आणि नेटकऱ्यांच्या मोबाईलवर आमदारांचा बाईट पाहून जिल्ह्यातील नेटकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. तर काहींनी संतापही व्यक्त करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहे.

हेही वाचा - भाजप आमदाराच्या कारला मोटारसायकलची जोरदार धडक; दुचाकीवरील तरुण-तरुणी ठार

हेही वाचा -'नवी मुंबईतील सिडकोसह, खासगी इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी 4 चटई क्षेत्राचा प्रस्ताव'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.