ETV Bharat / state

Anant Karmuse Assault Case : मंत्री जितेंद्र आव्हाड यांची ताबडतोब हकालपट्टी करा - किरीट सोमैया

मनसुख हिरेन प्रकरणात अनिल देशमुख यांना घरी जावे लागले. अनंत करमुसे यांची ठाकरे पवार सरकारला हत्या करून दहशत माजवायची होती आणि त्याची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्यावर होती, म्हणून जितेंद्र आव्हाड यांची ताबडतोब हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी किरीट सोमय्या यांनी केली.

सोमैया
सोमैया
author img

By

Published : Oct 15, 2021, 3:20 PM IST

Updated : Oct 15, 2021, 3:42 PM IST

ठाणे - अनंत करमुसे मारहाण प्रकरणात काल (गुरुवारी) मंत्री जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक करून जामीन देखील मंजूर झाला. त्यानंतर आज (शुक्रवारी) सकाळी अनंत करमुसे यांना घेऊन भाजपा नेते किरीट सोमैया हे वर्तक नगर पोलीस स्टेशन येथे पोलिसांची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी आरोप असलेल्या पोलिसांवर आणि अन्य गुन्हेगारांवर ज्याप्रमाणे कलम लावलेत, त्याप्रमाणे जितेंद्र आव्हाड देखील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर देखील तीच कलमे लावावीत, अशी मागणी सोमैयांनी केली आहे. असा गुन्हेगार महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये बसणे योग्य नाही, असेही सोमैया म्हणाले. मनसुख हिरेन प्रकरणात अनिल देशमुख यांना घरी जावे लागले. अनंत करमुसे यांची ठाकरे पवार सरकारला हत्या करून दहशत माजवायची होती आणि त्याची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्यावर होती, म्हणून जितेंद्र आव्हाड यांची ताबडतोब हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी किरीट सोमय्या यांनी केली.

'मंत्री जितेंद्र आव्हाड यांची ताबडतोब हकालपट्टी करा'
किरीट सोमैया गेले पोलीस ठाण्यात

करमुसे मारहाण प्रकरणात मंत्री आव्हाड यांच्यावर कलम लावण्यात आली आहेत, ती कमी आहेत. ते देखील मुख्य गुन्हेगार असल्याचे सांगत किरीट सोमैयांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात अनंत करमुसे यांच्यासोबत जाऊन जाब विचारला आणि वाढीव कलमांची मागणी केली.

'माझा मनसुख हिरेनप्रमाणे हत्येचा कट होता'

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी मला वसई खाडीत फेकण्याची धमकी दिली होती. पोलीस दबावाखाली काम करत आहेत. हा तपास केंद्रीय संस्थेने करावा, अशी मागणी करमुसे यांनी पोलिसांना भेटून झाल्यावर केली आहे.

काय आहे प्रकरण?

कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व भारतीयांना दिवे लावण्याचे आवाहन केले होते. याला जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला होता. मात्र देशवासीयांनी भरभरून पंतप्रधानांच्या आवाहानाला पाठिंबा दिला होता. त्यांनतर कासार वडवली येथील अनंत करमुसे या तरुणाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पोस्ट लिहिली होती. त्यानंतर या तरुणाने आव्हाडांचे एक अश्लील चित्रही सोशल माध्यमावर पोस्ट केले होते. यानंतर आव्हाड यांच्या सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी त्यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी नेले. त्या वेळी निवासस्थानी आव्हाड उपस्थित होते. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करसुमे यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती.

हेही वाचा - तंत्रज्ञानाचा अतिरेक आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर नियंत्रण गरजेचे - सरसंघचालक मोहन भागवत

Last Updated : Oct 15, 2021, 3:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.