ETV Bharat / state

Thane Crime News : तोतया आयपीएस अधिकाऱ्यानसह भाजप पदाधिकाऱ्याकडून काँग्रेस पदाधिकाऱ्याला २ लाखांचा चुना - सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

ठाणे जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्याने सरकारी नोकरीचे आमिष दाखवून कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्याला फसवले आहे. या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane Crime News
ठाणे क्राईम न्यूज
author img

By

Published : Jul 9, 2023, 9:50 PM IST

Updated : Jul 10, 2023, 7:29 AM IST

ठाणे : जिल्हातील ग्रामीण भागात भाजपच्या पदाधिकाऱ्याने तोतया आयपीएस अधिकाऱ्याशी संगणमत करून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका कॉग्रेस पदाधिकाऱ्याला २ लाखाचा चुना लावल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मुरबाड तालुक्यातील टोकावडे गावाच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी टोकावडे ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांवर भादंवि कलम ४२० सह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

आरोपीची नावे : संतोष बबन पवार (रा. माल्हेड, ता. मुरबाड ) आणि जगदीश बबन वाळींब (रा. शिरगाव, ता. शहापूर ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीची नावे आहेत. तर मधुकर देसले (वय ५६, रा. टोकावडे ) असे तक्रारदार कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे आरोपी संतोष पवार हा ठाणे जिल्हा भाजपच्या कामगार आघाडीचा पदाधिकारी आहे. तर आरोपी जगदीश वाळींब हा तोतया आयपीएस अधिकारी असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

या प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. लवकरच दोन्ही आरोपींना अटक करण्यात येईल. - सचिन कुलकर्णी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, टोकावडे पोलीस ठाणे

दोन लाखांची मागणी : तक्रारदार मधुकर देसले हे कुटूंबासह मुरबाड तालुक्यातील टोकावडे परिसरात राहतात. तर आरोपी संतोष पवारचे मुरबाड तहसील कार्यलयासमोर झेरॉक्सचे दुकान आहे. याच दुकानात दोघांची २०२१ साली ओळख झाली होती. त्यानंतर २५ ऑगस्ट २०२१ दोघांची पुन्हा दुकानात भेट झाली असता, आरोपी संतोषने देसले यांच्याकडे पत्नीचे गहाण ठेवलेले दागिने सोडविण्यासाठी पाच दिवसासाठी दोन लाखांची मागणी केली. ओळख असल्याने आरोपीवर विश्वास ठेवून देसले यांनी दोन लाख रुपये आरोपी संतोषला दिले.

नोकरीचे आमिष : त्यानंतर सायंकाळीच पुन्हा दुकानात भेट झाली असता, आरोपी संतोषने देसले यांना आरोग्य विभागात नोकरीसाठी जाहिरात निघाल्या आहेत. जर तुमच्या कोणा नातेवाईकाला नोकरी लावायची असले तर सांगा. माझा नातेवाईक मोठा अधिकारी असून आयपीएस ऑफिसर आहेत. ते नोकरीवर लावण्याचे काम करून देतील. असे बोलून आरोपी संतोषने देसले यांना नोकरीचे आमिष दाखवले. आरोपीच्या अमिषाला बळी पडून देसले यांनी भाचा गणेश घोलप याने आरोग्य विभागात वाहन चालक म्हणून अर्ज भरला आहे. त्याचे नोकरीचे काम होणार का ? असे देसले यांनी विचारले असता, आरोपीने होकार दिला.

पैशांची मागणी : त्यानंतर २६ ऑगस्ट २०२१ रोजी मुंबईतील ताज हॉटेलच्या लगत असलेल्या हॉटेलमध्ये आरोपी संतोषने तोतया आयपीएस अधिकारी जगदीश याची भेट देसले यांना करून दिली. त्यावेळी हॉटेलमध्ये मिटिंग होऊन भाचा गणेशच्या नोकरीचे काम होईल. मात्र तुम्हाला १० लाख द्यावे लागतील. मात्र त्याअगोदर ऍडव्हांस म्हणून ३ लाख द्या, असे तोतया आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून देसले यांनी आणखी एक लाख आणि आरोपी संतोषने दागिने सोडविण्यासाठी घेतलेले दोन लाख, असे एकूण तीन लाख दिल्याचे देसले यांनी तक्रारीत म्हटले आहे.

रक्कम परत करण्याचा तगादा : त्यानंतर २ संप्टेंबर २०२१ नंतर देसले यांनी भाचा गणेश याच्या नोकरीचे काम कधी होणार? असे आरोपी संतोष याला विचारले असता, आरोग्य विभागाची भरती परीक्षा रद्द झाली. असे देसले यांना सांगितल्याने त्यांनी आरोपीकडे दिलेली रक्कम परत करण्याचा तगादा लावला होता. त्यामुळे आरोपीने धनादेश दिले होते. मात्र ते धनादेश बॅँकेत जमा केले असता दोन्ही धनादेश बाऊंस झाले. त्यानंतर वर्ष उलटूनही रक्कमेसाठी देसले आरोपीकडे तगादा लावत असताना आरोपी संतोषने ५० हजार दिले.

पोलीस ठाण्यात धाव : दरम्यान, नोकरीसाठी दिलेल्या रक्कमेपैकी दोन लाख रुपये परत देण्यासाठी आरोपी संतोष हा टाळाटाळ करीत होता. शिवाय देसले यांना मारण्याची धमकी देत, माझा नातेवाईक आयपीएस अधिकारी असल्याने मला पोलीस घाबरतात असे बोलून आरोपी संतोष सतत धमकी देत होता. अखेर रक्कम परत मिळत नसल्याचे पाहून देसले यांनी ७ जुलै २०२३ रोजी टोकावडे पोलीस ठाण्यात धाव घेऊन दोन्ही आरोपी विरोधात भादंवि कलम ४२०, १७०, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला.

हेही वाचा :

  1. Mumbai Crime News: साखर निर्यातीच्या नावाखाली परदेशातील व्यवसायिकाला 17 कोटींचा गंडा; तिघांना अटक
  2. Bhandara Crime: क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; दोन आरोपींवर गुन्हा दाखल

Last Updated : Jul 10, 2023, 7:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.