ETV Bharat / state

भाजपचा नगरसेवक क्लबमध्ये जुगार खेळण्यात व्यस्त.. ठाण्यातील प्रताप - जुगार

सध्या काही राजकीय नेते गरीबांना दोन वेळेचे जेवण खावू घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तर ठाण्यातील भाजप नगरसेवक मास्क न घालता क्लबमध्ये जुगार खेळण्यात व्यस्त आहे. या व्हिडिओने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.

BJP corporator
भाजप नगरसेवक
author img

By

Published : Apr 17, 2020, 10:17 AM IST

ठाणे - भाजपला जबरदस्त धक्का देण्याचे कृत्य त्यांच्याच एका नगरसेवकाने केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. काही राजकीय नेते गरिबांना दोन वेळेचे जेवण खावू घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तर हा भाजप नगरसेवक मास्क न घालता क्लबमध्ये जुगार खेळण्यात व्यस्त आहे. या व्हिडिओने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.

नगरसेवक क्लबमध्ये जुगार खेळण्यात व्यस्त

सध्या संपूर्ण देशात कोरोनाच प्रादुर्भाव होत असल्याने सबंध देश लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली आहे. राज्य आणि केंद्र सरकार या रोगावर मात करण्यासाठी झटत असताना ठाण्यात मात्र वेगळेच चित्र पहायला मिळाले. या संकटकाळात आपल्या जनतेला मदत करण्याचे सोडून वागळे इस्टेटचा नगरसेवक विलास कांबळे जुगार खेळताना दिसत आहेत.

गुरुवार सायंकाळी वादग्रस्त नगरसेवक विलास कांबळे डेपो शेजारील क्लबमध्ये जुगार खेळत होता. सोशल डिस्टनसिंग आणि तोंडावर मास्क लावता लोकांच्या घोळक्यात नगरसेवक जुगार खेळत आहे. विलास कांबळे या अगोदर देखील अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. लैंगिक अत्याचार, बारमध्ये तोडफोड आणि फसवणूक यासारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद त्याच्या नावावर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.