ठाणे - केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत गेल्या १० दिवसांपासून देशभरातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या शेतकरी आंदोलना पाठिंबा व नव्याने लागू झालेला कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी आज राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून केंद सरकार विरोधात भिवंडीत मोर्चा काढला होता.
नवा कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीचे दिले निवेदन
भिवंडी राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष भगवान टावरे यांच्या नेतृत्वाखाली आज भिवंडी शहरातील प्रमुख रस्त्यावर शेकडो कार्यकर्ते एकत्र येत, केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नव्या कृषी कायद्याला विरोध करीत, हा कायदा शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा असल्याने रद्द करण्याची यावेळी मागणी करण्यात आली. हा मोर्चा दुपारच्या सुमाराला प्रांत अधिकारी कार्यलयावर धडकताच मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यांनतर प्रांत अधिकारी मोहन नळदकर यांना केंद्र सरकारचा नवा कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हेही वाचा - दिल्ली मार्च : 'वर्षभर पुरेलं एवढं राशन आमच्याकडं, रस्त्यावर राहण्यास तयार'