ETV Bharat / state

Fight BJP NCP Workers Thane भाजपा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत जीममध्ये हाणामारी, घटना सीसीटीव्हीत कैद - जुन्या वादातून भाजपा एनसीपी कार्यकर्ते भिडले

राजकीय वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. कल्याण तालुक्यातील संदप भोपर गावातील जिममध्ये घडली आहे. मारहाणीचा प्रकार जीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात Manpada Police Station दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यावर परस्पर गुन्हे दाखल करून दोन्ही राजकीय गटातील काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वाद
वाद
author img

By

Published : Aug 17, 2022, 5:41 PM IST

Updated : Aug 17, 2022, 5:52 PM IST

ठाणे भाजपा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये जिममध्येच राजकीय वादातून हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण तालुक्यातील संदप भोपर गावातील जिममध्ये घडली आहे. मारहाणीचा प्रकार जीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात Manpada Police Station दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यावर परस्पर गुन्हे दाखल करून दोन्ही राजकीय गटातील काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हाणामारीचा व्हायरल सीसीटीव्ही फुटेज

जुन्या राजकीय वाद उकरून काढल्याने हाणामारी : गेल्या दीड महिन्यापासून राज्यात सत्ता संघर्ष सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटल्याचे पाहवयास मिळत आहे. असाच राजकीय वाद संदप भोपर गावात राहणारे राष्ट्रवादीचे ग्रामीण पदाधिकारी ब्रह्मा माळी आणि भाजपाचे पदाधिकारी कुंदन माळी यांच्यात बऱ्याच दिवसापासून सुरु आहे. त्यातच आज सकाळच्या सुमारास राष्ट्रवादीचे ब्रह्मा माळी हे जिममध्ये असताना भाजपाचे पदाधिकारी कुंदन माळी हे अचानक आपल्या कार्यकर्त्यांसह जिममध्ये येऊन जुन्या राजकीय वाद उकरून काढला. त्यामुळे पुन्हा दोघांमध्ये वाद होऊन शिवीगाळ करत हाणामारी सुरु झाली. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्त्या एकमेकांवर तुटून पडले होते. तर मारहाण करून एक गट जिममधून पळून गेला.

सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल : काही वेळातच मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने दोन्ही राजकीय पक्षाच्या गोटात खळबळ माजून गावातील राजकीय वातावरण तापले होते. अखेर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दोन्ही गटावर परस्पर गुन्हे दाखल करून काही जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास मानपाडा पोलीस करीत आहेत.

हेही वाचा - Video भररस्त्यात पादचाऱ्याला बेदम मारहाण अंबरनाथ येथील घटना मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद

Last Updated : Aug 17, 2022, 5:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.