ETV Bharat / state

नाशवंत शेतमालाच्या वाहतुकीवरील बंदी उठवली - वाहतूक शाखा उपायुक्त अमित काळे न्यूज

ठाणे शहरातून अवजड वाहनांना ठराविक वेळेतच वाहतुकीची परवानगी आहे. याचा फटका फळे आणि नाशवंत शेतमालाच्या वाहतुकीला बसत होता.

नाशवंत शेतमालाच्या वाहतुकीवरील बंदी उठवली

author img

By

Published : Jan 11, 2020, 10:22 AM IST

ठाणे - ३१ मार्चपर्यंत शेतमालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना २४ तास वाहतुकीला परवानगी देण्यात आली. शहरातून अवजड वाहनांना ठराविक वेळेतच वाहतुकीची परवानगी आहे. याचा फटका फळे आणि नाशवंत शेतमालाच्या वाहतुकीला बसत होता. नाशवंत असलेला हा माल वेळेत न पोहचल्याने खराब होई. याचा परिणाम शेतकरी आणि फळ व्यावसायिकांच्या उत्पन्नावर होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ठाणे शहर वाहतूक शाखेने फळ वाहतूकदारांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

नाशवंत शेतमालाच्या वाहतुकीवरील बंदी उठवली

मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे शहरात वाहतूक कोंडी होते. ही कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांची मोठी दमछाक होई. त्यामुळे मागील वर्षी १० सप्टेंबरपासून पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी एक अधिसूचना जारी केली होती.

हेही वाचा - राजा दिनकर केळकर वस्तू संग्रहालयाला १०० वर्ष पूर्ण; मात्र, जागेअभावी दुर्मिळ वस्तू नागरिकांच्या दृष्टीआड

या सूचनेनुसार मालवाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील मार्गावरून दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत जाण्यास परवानगी होती. तसेच, जवाहरलाल नेहरू बंदर(जेएनपीटी), नवी मुंबईकडे ये-जा करणारी वाहने ठाणे शहरातील मुंब्रा बायपासमार्गेच जातील. कल्याण शहरातून जेएनपीटीकडे ये-जा करणारी वाहने रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत कल्याण फाटा मार्गे जाण्यास मुभा दिली होती. या निर्णयाचा फटका फळांची वाहतुकीला बसला.

ही बाब लक्षात आल्यानंतर शहर वाहतूक शाखेने या बाबत नवीन अधिसूचना काढून शेतीमालाच्या वाहतुकीला परवानगी दिली. मात्र, वाहनांची कडक तपासणी करूनच वाहने सोडली जातील. इतर वाहनांना अगोदरचेच वाहतूक नियम लागू राहतील, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी दिली.

Intro:ठाणे शहरात फळ भाज्यासाठी अवजड वाहतुकीवरिल बंदी पोलिसांनी उठवलीBody:अवजड वाहनांना ठराविक वेळेतच वाहतुकीची मुभा असल्याने याचा फटका फळांची वाहतूक करणाऱ्या कंटेनरला बसू लागला आहे. नाशवंत असलेला हा माल वेळेत न पोहचल्यास खराब होऊन याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरही होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ठाणे शहर वाहतूक शाखेने फळ वाहतूकदारांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून ३१ मार्चपर्यंत या कंटेनरना कोणत्याही वेळेत २४ तास वाहतुकीस मुभा देण्यात आली आहे. याबाबत वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी अधिसूचना जारी केली आहे.
मालवाहतूक करणाऱ्या जड, अवजड वाहनांमुळे अनेकदा वाहतूककोंडी होते. काहीवेळ वाहनांच्या लांबच लांब रांगाही लागतात. त्यामुळे कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांची मोठी दमछाक होत असल्याचे दिसून येते. सर्वसामान्य नागरिकांना कोंडीचा फटका बसत असल्याचे चित्र आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक विभागाकडून विविध प्रयत्नही केले जात असून आवश्यकतेनुसार अधिसूचना काढून वाहतुकीमध्ये बदलही करण्यात येतात. त्यानुसार गेल्या वर्षी १० सप्टेंबर रोजी पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी एक अधिसूचना जारी केली होती. या सूचनेनुसार मालवाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील मार्गावरून दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत जाण्यास मुभा देण्यात आली. तसेच, जेएनपीटी नवी मुंबईकडे ये-जा करणारी वाहने ठाणे शहरातील मुंब्रा बायपासमार्गेच जातील. शिवाय कल्याण शहरातून जेएनपीटीकडे ये-जा करणारी वाहने रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत कल्याण फाटा मार्गे जाण्यासही मुभा दिली होती. परंतु या निर्णयाचा फटका फळांची वाहतूक करणाऱ्या कंटेनरला बसू लागला होता. फळे नाशवंत असल्याने वेळेत माल पोहचणे गरजेचे आहे. विशेषकरून द्राक्षे, डाळिंब आणि इतर फळांची वाहतूक करणारे कंटेनर नाशिक, पडघा, कल्याणमार्गे शिळफाटा बायपास, कळंबोलीवरून जेएनपीटीला जातात.

byte :: अमित काळे (उपायुक्त ठाणे वाहतूक विभाग )

byte :;संजना खानविलकर (फळ व्यवसायिक )Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.