ETV Bharat / state

रस्त्यांच्या निकृष्ट कामांचे पितळ उघडे पाडणारा व्हिडिओ व्हायरल, पाहा कसा करतायत रस्ता! - latest bhiwandi news

शहरातील धामणकर नाका ते वऱ्हाळदेवी मंदिर दरम्यान रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मे. ईगल कन्स्ट्रक्शन खासगी ठेकेदार हे काम पाहतात. मात्र, या ठेकेदाराने डांबराऐवजी चक्क ऑइल मिश्रीत निकृष्ट डांबर रस्त्या बनविण्यासाठी वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

भिंवडी
भिंवडी
author img

By

Published : May 21, 2020, 7:27 PM IST

ठाणे - पावसाळा जवळ आल्याने पावसाळ्यापूर्वीच्या रस्ते कामांना राज्य शासनाने मंजुरी दिल्या आहेत. भिवंडी शहरांतर्गत रखडलेल्या रस्त्यांची कामे मनपा प्रशासनाने हाती घेतली आहेत. मात्र, सध्या या कामांकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाची कामे सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने भिवंडी मनपा प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे.

पहा कसा करतायत रस्ता..

शहरातील धामणकर नाका ते वऱ्हाळदेवी मंदिर दरम्यान रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मे. ईगल कन्स्ट्रक्शन खासगी ठेकेदार हे काम पाहतात. मात्र, या ठेकेदाराने डांबराऐवजी चक्क ऑइल मिश्रीत निकृष्ट डांबर रस्त्या बनविण्यासाठी वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

एवढेच नाही तर शासकीय नियमांची पायमल्ली करून चक्क मातीवर व दगडांच्या थरावर हे ऑइल मिश्रीत डांबर टाकून ठेकेदार डांबरी रस्त्याचे काम करत असल्याचे खळबळजनक वास्तव समोर आले आहे. शहरातील कामतघर परिसरात राहणारे दक्ष नागरिक अ‌ॅड. भागवत वाघमारे यांच्या नजरेस हे काम पडल्याने त्यांनी याबाबत संबंधित ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली. कर्मचाऱ्यांनी वाघमारे यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर वाघमारे यांनी या निकृष्ट कामाचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर टाकला. सध्या हा व्हिडिओ भिवंडी व परिसरात चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओने निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांसह मनपा प्रशासनाचे पितळ चांगलेच उघडे पडले आहे.

या रस्त्याची दुरवस्था झाल्याने अनेक अपघात झाले असून अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. तब्बल तीन वर्षानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळाला असून ठेकेदार अशा प्रकारची कामे करत आहेत आणि मनपा प्रशासनाचे व स्थानिक लोकप्रतिनिधींचे याकडे लक्ष नाही. मनपा प्रशासनाने ठेकेदारांवर कारवाई केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया वाघमारे यांनी दिली.

व्हिडिओची दखल मनपा प्रशासनाने घेतली असून सकाळीच सदर ठिकाणी पाहणी करून ठेकेदाराने बनविलेल्या निकृष्ट रस्त्याचा भाग जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकण्यात आला आहे. अशी प्रतिक्रिया भिवंडी मनपाचे प्रभारी मुख्य शहर अभियंता एल. पी. गायकवाड यांनी दिली. दरम्यान, दक्ष नागरिकाच्या या व्हिडिओने भिवंडी मनपा प्रशासनाचे पितळ उघडे पडले, हे मात्र नक्की.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.