ETV Bharat / state

अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडून चोरटयांनी केली १३ लाखांची रोकड लंपास - shahapur police

मुंबई-नाशिक महामार्गापासून आसनगाव गावातून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. एटीएमधील सीसीटीव्ही कॅमेरा बंद होता, तसेच सुरक्षा रक्षक देखील नसल्याने चोरट्याने संधी साधून गुरुवारी रात्री एटीएमच्या बाहेर असलेला सीसीटीव्ही कॅमेरा फोडला व एटीएममधील रकमेचा बॉक्स फोडला.

axis bank atm robbery in thane
अॅक्सिस बँकेचे एटिएम फोडून चोरटयांनी केली १३ लाखांची रोकड लंपास
author img

By

Published : Dec 20, 2019, 3:33 PM IST

ठाणे - अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडून 13 लाखांची रोकड चोरांनी लंपास केल्याची घटना शहापूर तालुक्यातील आसनगाव येथे घडली आहे. याप्रकरणी चोरांविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अॅक्सिस बँकेचे एटिएम फोडून चोरटयांनी केली १३ लाखांची रोकड लंपास

मुंबई-नाशिक महामार्गापासून आसनगाव गावातून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. एटीएमधील सीसीटीव्ही कॅमेरा बंद होता, तसेच सुरक्षा रक्षक देखील नसल्याने चोरट्याने संधी साधून गुरुवारी रात्री एटीएमच्या बाहेर असलेला सीसीटीव्ही कॅमेरा फोडला व एटीएममधील रकमेचा बॉक्स फोडला. तब्बल १३ लाख एक हजार ७०० रुपये घेऊन चोरांनी पोबारा केला आहे.

एजीएस या कंपनीला कॅमेरा व वॉचमनची व्यवस्था करणे एटीएममध्ये पैसे भरणे व तांत्रिक बिघाड झाल्यास दुरुस्ती करणे आदी कामाचा ठेका देण्यात आला होता. या कंपनीचे व्यवस्थापक गौतम परिहार यांनी याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Intro:kit 319Body:अँक्सिस बँकेचे एटिएम फोडून चोरटयांनी केली १३ लाखांची रोकड लंपास

ठाणे : अँक्सिस बँकेचे एटीएम फोडून १३ लाखांची रोकड चोरटयांनी लंपास केल्याची घटना शहापूर तालुक्यातील आसनगाव येथे घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई - नाशिक महामार्गापासून आसनगाव गावातून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अँक्सिस बँकेचे एटीएम आहे. एटीएमच्या आतमध्ये बंद स्थितीत असलेला सीसीटीव्ही कॅमेरा तसेच वॉचमन देखील नसल्याने चोरट्याने संधी साधून काल रात्रीच्या सुमाराला या एटीएमच्या बाहेर असलेला सीसीटीव्ही कॅमेरा फोडल्यानंतर एटीएमचा कॅश बॉक्स फोडला. आणि तब्बल १३ लाख एक हजार ७०० रुपये घेऊन पोबारा केला आहे.
एजीएस ट्रँझ्याक्त टेक्नॉलॉजी या कंपनीला कॅमेरा व वॉचमनची व्यवस्था करणे एटीएममध्ये पैसे भरणे व तांत्रिक बिघाड झाल्यास दुरुस्ती करणे आदी कामाचा ठेका देण्यात आला असून या कंपनीचे व्यवस्थापक गौतम परिहार यांनी याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

Conclusion:atm
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.