ठाणे Attack on Fadnavis Brother site : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बंधू आशीष फडणवीसांचा भागीदारीमध्ये कल्याण तालुक्यातील म्हसकळ हद्दीत मोठं गृह संकुल प्रकल्प उभारणीचं काम सुरू आहे. या बांधकामाच्या ठिकाणी बांधकाम साहित्य पुरवण्यावरुन पुरवठादार आणि ठेकेदार, कामगार यांच्यात आर्थिक व्यवहारांवरुन वादावादी झाली. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंच्या गटातील पदाधिकारी असलेल्या पुरवठादार आणि त्याच्या १० जणांनी विकासक फडणवीस यांच्या ठेकेदार व कामगारांना हाॅकी स्टीकने बेदम मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेंच्या गटातील पदाधिकारी संदीप तरेंसह इतर १० जणांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. विशेष म्हणजे आरोपी संदीप तरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या टिटवाळा विभागाचे उपविभाग प्रमुख आहेत.
आर्थिक व्यवहारातून धुसफूस : कल्याण तालुक्यातील टिटवाळा जवळील म्हसकळ येथे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे बंधू आशीष फडणवीसांचा भागीदारीतून कलश दर्शन नावाच्या गृहप्रकल्पाचं काम सुरू आहे. या गृहप्रकल्पासाठी बांधकाम साहित्य पुरवण्याचे काम करण्यासाठी आशीष फडणवीस यांनी एक ठेकेदार नियुक्त केलाय. या ठेकेदाराने स्थानिक रहिवासी म्हणून आरोपी संदीप तरेंना बांधकाम साहित्य पुरविण्याचं काम दिलंय. मात्र, बांधकाम साहित्य पुरवण्यातील आर्थिक व्यवहारातून आरोपी तरे आणि विकासकाचा ठेकेदार यांच्यात धुसफूस सुरु होती. ही धुसफूस वाढल्याने पुरवठादार संदीप तरे आणि त्यांच्या समर्थक १० जणांनी म्हसकळ येथील कलश दर्शन प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन तेथील ठेकेदार आणि कामगारांना हाॅकी स्टीकने बेदम मारहाण केली. या मारहाणीत ठेकेदारासह कामगार गंभीर जखमी झालेत. या मारहाणीनंतर हल्लेखोर तेथून पळून गेले असून तर या रक्तरंजित राड्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय.
१० जणांविरुध्द खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा : या प्रकल्पावरील ठेकेदाराच्या तक्रारीवरुन कल्याण पोलिसांनी १० जणांविरुध्द खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलाय. या घटनेतील सर्वच हल्लेखोर फरार झाले असून, या हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी दिलीय.
हेही वाचा :