ETV Bharat / state

Thane Crime News : खळबळजनक! पब्जी गेम खेळताना झाला दोन मित्रांमध्ये वाद; मित्रावरच केला वार - पब्जी गेम खेळताना झाला वाद

पब्जी या जीवघेण्या खेळाचे भूत तरुणाईच्या मानगुटीवरून उतरण्याची चिन्ह काही दिसत नाहीत. यापूर्वीही आपण या खेळावरुन अनेकांनी आपले जीव गमावल्याच्या घटना ऐकल्या आहेत. आता ठाण्यातही पब्जी गेमवरुन धक्कादायक घटना घडली आहे. खेळाच्या वादातून मित्रानेच आपल्या मित्रावर टोकदार हत्यारने वार केला आहे.

Thane Crime News
मित्रावर टोकदार हत्यारने वार
author img

By

Published : Jul 31, 2023, 3:47 PM IST

ठाणे : मोबाईलवर पब्जी गेम खेळतानाच एका मित्राने दुसऱ्या मित्राला अश्लील शिव्यांची कमेंट केल्याप्रकरणी त्याच्यात वाद झाला. या वादातून शिवीगाळ करणाऱ्या मित्रावर टोकदार हत्यारने वार करण्यात आला. यात मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील कोनगावातील एका घरात घडली आहे. याप्रकरणी हल्लेखोर मित्रावर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाईलवर पब्जी गेम खेळत वाद : जखमी आकाश हा कोनगावमधील आराध्य अपार्टमेंट येथील चौथ्या मजल्यावर कुटुंबासह राहून एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तर हल्लेखोर सनी हा कोनगावात धर्मा निवासमध्ये राहत असल्याने दोघे एकमेकांचे मित्र आहेत. मित्र असल्याने दोघेही मोबाईलवर पब्जी गेम खेळत असताना आकाशने सनीला गेम खेळताना अश्लील शिव्यांची कमेंट केली होती. त्यावरून दोघांमध्ये वाद होऊन पब्जी गेम खेळणे बंद केले होते.

कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : अश्लील शिव्यांची कमेंट केल्याप्रकरणी त्यांच्यात वाद झाला. या वादातून शिवीगाळ करणाऱ्या मित्रावर टोकदार हत्यारने वार करण्यात आला. यात मित्र गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी हल्लेखोर मित्रावर कोनगाव पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सनी बंडू कापडी (वय २०, रा. धर्मा निवास कोनगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोर मित्राचे नाव आहे. तर आकाश नाना महाजन (वय २०, रा. आराध्य अपार्टमेंट कोनगाव ) असे हल्ल्यात जखमी झालेल्या मित्राचे नाव आहे.

धारदार हत्यारने केला वार : या घटनेनंतर आकाश हा सनी राहत असलेल्या धर्मा निवासात ३० जुलै रोजी रात्री साडेआठ वाजल्याच्या सुमारास काही कामानिमित्त आला होता. त्यावेळी पुन्हा पब्जी गेममध्ये शिवीगाळ केल्याचा वाद धर्मा निवासात उफाळून येताच, सनीने अचानक आकाशवर धारदार हत्यारने दोन तीन वार करत त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर जखमी अवस्थेत आकाशला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात सोमवार पाहटेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील करीत आहेत.

हेही वाचा -

  1. College Girl Killed In Delhi : दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीचा खून, रॉडने वार करुन मृतदेह टाकला बाकड्याखाली
  2. Sword Attack Viral Video: जमिनीच्या वादातून भावावर तलवारीने हल्ला; व्हिडिओ व्हायरल
  3. Koyata Attacked : पुण्यात पुन्हा माथेफिरुचा हल्ला; फ्री सिगारेट न दिल्याने हॉटेल चालकावर कोयत्याचे वार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.