ETV Bharat / state

संतापजनक..! भिवंडीत काकाचा आठ वर्षीय पुतणीवर, तर आईच्या प्रियकराचा बारा वर्षीय मुलीवर अत्याचार - सख्ख्या पुतणीवर

भिवंडी शहरात देखील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. शहरातील एका आठ वर्षीय सख्ख्या पुतणीवर काकानेच अत्याचार केला आहे. तर दुसऱ्या घटनेत आईच्या प्रियकराने तिच्या बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

भिवंडी पोलीस ठाणे
author img

By

Published : Jun 14, 2019, 6:18 PM IST

ठाणे - अल्पवयीन मुलींसह महिलांवरील अत्याचारात दिवसागणिक वाढ होत आहे. शासनाने कठोर कायदे केल्यानंतरही सातत्याने या घटना घडतच आहेत. भिवंडी शहरात देखील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. शहरातील एका आठ वर्षीय सख्ख्या पुतणीवर काकानेच अत्याचार केला आहे. तर दुसऱ्या घटनेत आईच्या प्रियकराने तिच्या बारा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या दोन्ही धक्कादायक घटनांमुळे भिवंडी शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पहिल्या घटनेत नराधम काकाने आपल्या आठ वर्षीय अल्पवयीन सख्ख्या पुतणीवर अत्याचार केला आहे. पीडित मुलगी आई-वडिलांसह भिवंडीतील नवीवस्ती परिसरात राहते. तिच्या शेजारी तिचा नराधम काका सलीम शेख (वय 39) राहतो. गुरुवारी सायंकाळच्या सुमाराला पीडित पुतणीला बहाणा करून त्याच्या राहत्या घरी बोलावले. त्यानंतर आतून दरवाजा बंद करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

बराच वेळ मुलगी दिसत नसल्याने पीडित मुलीचे वडील मुलीला शोधण्यासाठी आले असता, त्यांना शेजारील घरातून आवाज आल्याने त्यांनी दरवाज्याच्या फटीतून आत डोकावून पाहिले. ते पाहून पीडित मुलीच्या वडिलांना धक्काच बसला. त्यांनी आरडाओरड केल्याने आरोपीने दरवाजा उघडला. त्यावेळी पीडित मुलीने तिच्यावर आलेला प्रसंग वडिलांना सांगितला. त्यानंतर वडिलांनी पीडित मुलीला घेऊन भिवंडी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी नराधमांवर अत्याचारासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत बारा वर्षीय अल्पवयीन पीडित मुलगी आपल्या आईसह भिवंडीतील कामतघर परिसरात राहते. चेन्नईहुन आलेला भरतभाई नागजीभाई पटेल (वय 28) तिच्या घरात राहत होता. तो पीडित मुलीच्या आईचा प्रियकर होता. आईच्या नराधम प्रियकराने तिच्या संगनमताने पीडित मुलीवर घरातच पाच दिवस वेळोवेळी अत्याचार केला. मात्र पीडित मुलीने विरोध केला असता, नराधम भरत सोबत तुला लग्न करायचे आहे, असे तिला तिच्या आईने सांगितले. आश्चर्याची बाब म्हणजे आईला आपली मुलगी अल्पवयीन आहे, हे माहिती असून सुद्धा तिने नराधमाच्या घृणास्पद प्रकाराला साथ दिली.

दरम्यान, पीडित मुलीला वारंवार होणाऱ्या अत्याचाराचा त्रास असह्य झाल्याने तिने शेजाऱ्यांच्यांना सांगितले. त्यांच्या मदतीने भिवंडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिच्यावर घडलेल्या प्रकाराबाबतची महिला पोलीस अधिकाऱ्यासमोर सांगितली. यावरून भिवंडी पोलिसांनी नराधम भरतभाईच्या विरोधात अत्याचारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. तर पीडित मुलीची आई नीलमदेवी विरोधात आरोपीला अत्याचार करण्यास मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस अधिकारी करीत आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:नराधम काकाचा आठ वर्षीय पुतणीवर ; तर आईच्या प्रियकराचा बारा वर्षे मुलीवर अत्याचार

ठाणे :- अल्पवयीन मुलीसह महिलांवर दिवसागणिक वाढलेल्या अत्याचारामुळे घटनांना शासनाने केलेल्या कठोर कायदे केल्यानंतरही सतत घटना घडतच आहे, त्यातच पुन्हा अत्याचाराच्या 2 घटना भिवंडी शहरात समोर आली आहे,

पहिल्या घटनेत नाराधम काकाने आपल्या आठ वर्षीय अल्पवयीन सख्ख्या पुतणीवर अत्याचार केला. तर दुसऱ्या घटनेत आईच्या नराधम प्रियकराने आईची संगणमत करून बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे .या दोन्ही धक्कादायक घटनामुळे भिवंडी शहरात एकच खळबळ उडाली आहे ,
या दोन्ही अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी भिवंडी शहर आणि नारपोली पोलीस ठाण्यात नराधमांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे,

पहिल्या घटनेत 8 वर्षीय अल्पवयीन पीडित मुलगी आई-वडिलांसह भिवंडीतील नविवस्ती परिसरात राहते, तिच्या शेजारी तिचा नराधम काका सलीम शेख, वय 39 हा राहतो, गुरुवारी सायंकाळच्या सुमाराला पीडित पुतणीला त्याच्या राहत्या घरी त्याने बहाण्याने बोलावले, त्यानंतर आतून दरवाजा बंद करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, त्याच सुमाराला पीडित मुलीचे वडील मुलीला शोधण्यासाठी आले असता, त्यांना शेजारी राहणारा त्यांचा आरोपी भाऊ त्याच्या घरातून आवाज आल्याने त्याने दरवाज्याच्या फटीतून आत डोकावून पाहिले असता, पीडित मुलीच्या वडिलांना धक्काच बसला , त्यांनी आरडाओरड केल्याने आरोपीने दरवाजा उघडला, त्यावेळी पीडित मुलीने तिच्यावर गुदरलेला प्रसंग वडिलांना सांगितला, यावर पीडित मुलीला घेऊन वडिलांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि नराधमांवर अत्याचारासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला, या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक करीत आहेत,
दुसऱ्या घटनेत बारा वर्षीय अल्पवयीन पीडित मुलगी आपल्या तीस वर्षे आईसह भिवंडी तील कामतघर परिसरात राहते, तिच्या घरात भरतभाई नागजीभाई पटेल हा 28 वर्षीय चेन्नईहुन आलेला तिच्या आईचा प्रियकर राहत होता, आईच्या नराधम प्रियकराने तिच्या संगनमताने पीडित मुलीवर घरातच पाच दिवस वेळोवेळी अत्याचार केला, मात्र पीडित मुलीने विरोध केला असता तिच्या आईने नराधम भरत सोबत तुझे लग्न करायचे आहे असे तिला सांगितले, खळबळजनक बाब म्हणजे आईला आपली मुलगी अल्पवयीन आहे, हे माहिती असून सुद्धा तिने नराधमाच्या घृणास्पद प्रकाराला साथ देत राहिली, दरम्यान पीडित मुलीला वारंवार होणाऱ्या अत्याचाराचा त्रास असह्य झाल्याने तिने शेजाऱ्यांच्या मदतीने नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिच्यावर सतत पाच दिवस घडलेल्या प्रकाराबाबत महिला पोलीस अधिकाऱ्यासमोर कथन केले, यावरून नारपोली पोलिसांनी नराधम भरतभाई च्या विरोधात अत्याचारासह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला , तर पीडित मुलीची आई नीलमदेवी विरोधात आरोपीला अत्याचार करण्यास मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे , या गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस अधिकारी करीत आहे,

Conclusion:अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनेने खळबळ
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.