ETV Bharat / state

रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून नोकरदाराला लावला 12 लाखांचा चुना

author img

By

Published : Jun 26, 2022, 5:48 PM IST

कल्याणच्या एका भामट्याने रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून ( showing the lure of a job in the railways) अंबरनाथच्या नोकरदाराला तब्बल 12 लाखांचा चुना (an employee 12 lakh cheated) लावल्याची घटना उघडकीस आली आहे. अंबरनाथच्या नवरे नगरमधील शुभदा अपार्टमेंटमध्ये राहणारे जगन्नाथ नाना कांबळे (52) यांच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी रमेशचंद रामप्यारे पाशी (रा. पंचवटी कॉलनी, कल्याण-पूर्व) या भामट्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Cheating the servant
नोकरदाराला फसवले

ठाणे: तक्रारदार जगन्नाथ यांचा मुलगा अक्षय याला नोकरीची गरज होती. त्यामुळे आरोपी रमेशचंद पाशी याने अक्षय याला रेल्वेत नोकरीस लावतो, असे अमिष दाखवून ( showing the lure of a job in the railways) जगन्नाथ यांच्याकडून रोखीने स्वत:चे खात्यावर पैसे टाकण्यास भाग पाडले. तसेच त्याची पत्नी ज्योती हिच्याकडे रोख स्वरूपात देण्यास सांगितले. तसेच त्याचे मित्र विठ्ठल पिचड, शुभम पाटील, विनोद नवनांगे आणि किशोर पाटील यांच्याही बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले.

15 जानेवारी ते ऑगस्ट 2019 या दरम्यान झालेल्या व्यवहारात जगन्नाथ कांबळे यांच्याकडून तब्बल 11 लाख 95 हजार 700 रूपये रमेशचंद पाशी याने उकळले. (an employee 12 lakh cheated) मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जगन्नाथ कांबळे यांनी रमेशचंद पाशी या भामट्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी रमेशचंद पाशी या भामट्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या संदर्भात वरिष्ठ पोलिस निरीक्षक बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार दत्ता गोडे अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा : Crime: सतत मोबाईल वापरल्यामुळे पतीकडून पत्नीवर कटरने वार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.