ETV Bharat / state

Amruta Fadnavis Blackmail Case : अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणारी अनिक्षा सिघांनी पोलिसांच्या ताब्यात; डिझायनर इंटरनॅशनल बुकीची मुलगी - अनिक्षा सिंघानियावर गुन्हा दाखल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणारी डिझायनरला उल्हासनगरनगरमधुन ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच सिंघानिया यांच्या उल्हासनगरमधील घरावर पोलिसांनी छाप ठाकला आहे. इंटरनॅशनल प्रसिद्ध बुकी असलेल्या अनिल सिघांनीयाची यांची मुलगी अनिक्षा सिघांनीया यांनी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केले होते. त्याविरोधात पोलिसांनी अनिक्षाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अनिक्षा सिघांनीचे वडील गेल्या ८ वर्षापासून पोलीस रेकॉर्डवर फरार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

Amrita Fadnavis
Amrita Fadnavis
author img

By

Published : Mar 16, 2023, 4:11 PM IST

Updated : Mar 16, 2023, 4:19 PM IST

ठाणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणारी डिझायनर उल्हासनगर शहरात राहणारी आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बुकी अनिल सिंघानिया यांच्या मुलीने त्यांना ब्लॅकमेल केल्याचे समोर आले आहे. अनिक्षा सिघांनी असे तीचे नाव असून तिचे वडील गेल्या 8 वर्षांपासून पोलीस रेकॉर्डवरून फरार आहेत. या प्रकरणातील आरोपी अनिक्षा सिंघानियाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच सिंघानिया यांच्या उल्हासनगरमधील राहत्या घरावर पोलिसांनी छापे टाकले आहे. मुंबई पोलिसांचे पथक उल्हासनगर शहरातील अनिक्षाच्या घरात दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांनी अनिक्षा, तिच्या नातेवाईकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. मलबार हिल पोलिसांनी अनिक्षा, तिच्या वडिलांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 120-बी ( षड्यंत्र ) तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

डिझायनरविरोधात पोलिसांत गुन्हा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका डिझायनरविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, आरोपींनी पैशांची ऑफर देण्याचा प्रयत्न केला होता. तसेच अमृता फडणवीस यांना गुन्हेगारी प्रकरणात हस्तक्षेप करण्याची धमकी दिली होती. अमृता फडणवीस यांच्या तक्रारीवरून मलबार हिल पोलिस ठाण्यात 20 फेब्रुवारी रोजी प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यात आला आहे. अनिक्षा सिंघानिया असे आरोपी केलेल्या डिझायनरचे नाव आहे. ती काही काळापासून फडणवीस यांच्या संपर्कात होती. आरोपी अनेकदा फडणवीसांच्या घरीही गेली होती. डिझायनर अनिक्षा अमृता यांना व्हिडिओ क्लिप, व्हॉईस नोट्स, टेक्स्ट मेसेज पाठवून धमकावत होती.

भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल: पोलिसांनी अनिक्षा, तिच्या वडिलांविरोधात षडयंत्र, भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. एफआयआरनुसार, अनिक्षा गेल्या 16 महिन्यांपासून अमृता फडणवीसांच्या संपर्कात होती. पोलिसांना दिलेल्या निवेदनात अमृता फडणवीस यांनी सांगितले की, त्या नोव्हेंबर 2021 मध्ये अनिक्षाला पहिल्यांदा भेटल्या होत्या.

उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी मदत: अनिक्षा ही कपडे, दागिने, फुटवेअरची डिझायनर आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीला तीने तीचे तयार केलेले उत्पादन घालण्याची विनंती केली होती. त्यामुळे तिच्या उत्पादनांची जाहिरात करण्यास मदत होईल, असे मलबार हिल पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले.

अमृताला 1 कोटी रुपयांची ऑफर : अधिकाऱ्याने सांगितले की अमृता यांचा विश्वास संपादन केल्यानंतर अनिक्षाने त्यांना पैसे कमवण्याची ऑफर दिली होती. अमृता फडणवीस यांनी पोलिसांना सांगितले की ती अनिक्षाच्या वागण्याने त्या नाराज होत्या. त्यांनी अनिक्षाचा नंबर त्यामुळे ब्लॉक केला होता. त्यानंतर महिलेने एका अनोळखी नंबरवरून अमृता फडणवीसांना व्हिडिओ क्लिप, व्हॉईस नोट्स, तसेच अनेक मेसेज पाठवले. त्यांनतर अनिक्षाच्या वडिलांनी अमृता फडणवीसांना अप्रत्यक्षपणे धमकी दिली होती असे तक्रारीत म्हटले आहे. एफआयआरचा हवाला देत अधिकाऱ्याने सांगितले की, अमृता फडणवीस यांच्याविरोधात कट रचण्यात आला होता.

तपास सुरू : शहर पोलिसांनी अनिक्षा तसेच तिच्या वडिलांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 120-बी (षड्यंत्र) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, याप्रकरणी तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

हेही वाचा - Devendra Fadnavis in trouble : उपमुख्यमंत्र्यांना अडचणीत आणणारी 'ती' कोण?

Last Updated : Mar 16, 2023, 4:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.