ETV Bharat / state

ख्यातनाम चित्रकार अकबर पदमसी यांचे निधन

भारतीय आधुनिक कलेचे (इंडियन मॉडर्न आर्ट) ते जनक होते. त्यांनी केवळ चित्रेच रेखाटली नाहीत तर शिल्यकला, जलरंग, तैलचित्र, मूर्तीकाम कलेच्या अशा विविध प्रांतात त्यांचा हातखंडा होता.

चित्रकार अकबर पदमसी
चित्रकार अकबर पदमसी
author img

By

Published : Jan 7, 2020, 7:36 AM IST

ठाणे - आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ चित्रकार अकबर पदमसी यांचे कोईमतूर येथे काल (सोमवारी) सायंकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ९१ वर्ष‍ांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी भानुमती आणि मुलगी रईसा आहेत. राज्य शासनाच्या चित्रकार वासुदेव कामत यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या पाहिल्या जीवनगौरव पुरस्काराने पदमसी यांना सन्मानित करण्यात येणार होते. मात्र, हा सन्मान मिळण्याआधीच त्यांचे निधन झाल्याने कला विश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा- केंद्र सरकारकडून नैसर्गिक आपत्तीग्रस्त राज्यांना मदतनिधी मंजूर, महाराष्ट्राला तुटपुंजी मदत

पदमसी हे गेल्या काही वर्षांपासून ठाण्यात वास्तव्यास आले होते. ते कोईमतूर येथे सहलीसाठी गेले होते. तिथेच त्यांची तब्येत बिघडली. पदमसी या वयातही चित्रे रेखाटत होते. भारतीय आधुनिक कलेचे (इंडियन मॉडर्न आर्ट) ते जनक होते. त्यांनी केवळ चित्रेच रेखाटली नाहीत तर शिल्यकला, जलरंग, तैलचित्र, मूर्तीकाम कलेच्या अशा विविध प्रांतात त्यांचा हातखंडा होता. प्लॅस्टिकवरील कलाकुसर ते आजच्या ग्राफिक्समध्येही त्यांनी काम केले. दिवंगत चित्रकार वासुदेव कामत, एम. एफ. हुसेन यांचे ते समकालीन होत.

भारतीय चित्रकारांना त्यांच्या कलेचे मूल्य मिळवून देण्यात त्यांचाही सिंहाचा वाटा होता. ते स्वत: एक प्रयोगशील चित्रकार होते. त्यामुळेच चित्रकलेच्या विविध माध्यमात त्यांचा लिलया वावर होता. त्यांचे रिक्लाईन न्यूड हे चित्र न्यूयॉर्कमध्ये १,४२६,५०० डॉलरला विकले गेले होते. त्यांच्या जाण्याने कला विश्वाने एका प्रयोगशील कलाकाराला मुकले आहे. पदमसी हे उत्तम चित्रकार तर होतेच, पण ते चांगले माणुसही होते, अशा भावना चित्रकार सदाशिव कुलकर्णी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केल्या.

Intro:ज्येष्ठ चित्रकार अकबर पदमसी यांचे निधनBody:
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ चित्रकार अकबर पदमसी यांचे कोईमतूर येथे सोमवारी सायंकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ९१ वर्ष‍ांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी भानुमती आणि मुलगी रईसा आहे. राज्य शासनाच्या चित्रकार वासुदेव कामत यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा पाहिल्या जीवनगौरव पुरस्काराने आज पदमसी यांना सन्मानित करण्यात येणार होते, मात्र हा सन्मान मिळण्याआधीच त्यांचे निधन झाल्याने कला विश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पदमसी हे गेल्या काही वर्षापासून ठाण्यात वास्तव्यास आले होते. ते कोईमतूर येथे सहलीसाठी गेले होते. तिथेच त्यांची तब्येत बिघडल्याने बिघडली. पदमसी या वयातही चित्रे रेखाटत होते. भारतीय आधुनिक कलेचे ( इंडियन मॉडर्न आर्ट) ते जनक होते. त्यांनी केवळ चित्रेच रेखाटली नाहीत तर शिल्यकला, जलरंग, तैलचित्र , मूर्तीकाम कलेच्या अशा विविध प्रांतात त्यांचा हातखंडा होता. प्लॅस्टीक वरील कलाकुसर ते आजच्या ग्राफिक्स मध्येही त्यांनी काम केले. दिवंगत चित्रकार वासुदेव कामत, एम. एफ. हुसेन यांचे ते समकालीन होत.
भारतीय चित्रकारांना त्यांच्या कलेचे मूल्य मिळवून देण्यात त्यांचाही सिंहाचा वाटा होता. ते स्वत एक प्रयोगशील चित्रकार होते, त्यामुळेच चित्रकलेच्या विविध माध्यमात त्यांचा लिलया वावर होता. त्यांचे रिक्लाईन न्यूड हे चित्र न्यूयॉर्क मध्ये १,४२६,५०० डॉलरला विकले गेले होते. त्यांच्या जाण्याने कला विश्वाने एका प्रयोगशील कलाकाराला मुकले आहे. पदमसी हे उत्तम चित्रकार तर होतेच, पण ते चांगले माणुसही होते, अशा भावना चित्रकार सदाशिव कुलकर्णी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतांना व्यक्त केल्या.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.