नवी मुंबई - आंतरराष्ट्रीय विमानतळाचा वाद चांगलाच उफाळून आला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधीत प्रकल्पग्रस्तांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनेही केली. मात्र, अखेर प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक होऊन विमातळाचे काम बंद पाडले. विमातळाचे काम बंद पाडल्याने अनेक प्रकल्पग्रस्तांची पोलिसांनी धरपकड करुन अटक केली आहे.
हेही वाचा - औरंगाबादेत महिलेला घरात घुसून पेटवले, 95 टक्के भाजली
पर्यायी रस्ता तयार केल्याशिवाय मुख्य रस्ता बंद करून देणार नाही, असा पवित्रा घेऊन विमानतळाच्या कामाला विरोध करणाऱ्या विमातळ परिसरातील वाघिवली गावातील महिलांसह इतर पकल्पग्रस्तांना पोलीस बळ वापरुन फरफटत नेल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये एकदा असंतोष उफाळून आला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीत सिडकोने भूसंपादन आणि गावे स्थलांतर करताना केलेल्या वाटाघाटीप्रमाणे शब्द न पाळल्याने गेल्या महिनाभरापासून विमानतळ बाधीत प्रकल्पग्रस्तांनी सिडको भवनाच्या समोर मुक्काम आंदोलन छेडले आहे. वाघिवली गावातील महिलांनी पर्यायी रस्त्यासाठी सिडको ठेकेदाराचे काम अडवल्याने ठेकेदार आणि सिडकोने एनआयआर पोलिसांना पाचारण केले. त्यांनी महिलांना काम न अडवून धरण्यासंबधी सूचना दिल्या. मात्र, आंदोलनात उतरलेल्या महिलांनी कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता आपले आंदोलन सुरूच ठेवले. त्यामुळे या महिलांवर पोलिसांनी लाठीमार केला. काही महिलांना हाताला धरून फरफटत नेले. यात अनेक महिला जखमी झाल्या आहेत, अशी माहिती विमानतळ बाधीत प्रकल्पग्रस्त प्रेम पाटील यांनी दिली.
त्यानंतर आंदोलकांना नवी मुंबईतील बेलापूर येथील एनआयआर पोलीस ठाण्यात घेऊन गेले. या घटनेमुळे सिडकोविरोधात पुन्हा आक्रोश पेटला आहे.
हेही वाचा - दिल्ली विधानसभा निवडणूक : मनोज तिवारी यांची विशेष मुलाखत..