ठाणे - मुंबईनंतर ठाण्यातील रस्त्यांवरही फ्रान्सच्या अध्यक्षांचे पोस्टर चिकटवण्यात आले आहे. ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी याबाबत माहिती देत फ्रान्सच्या अध्यक्षांनी तत्काळ माफी मागवी, अशी मागणी केली आहे.
फ्रान्सचे अध्यक्ष एमॅन्यूएल मॅक्रान यांच्याविरोधात मुस्लीम देशांतून आंदोलन होत आहे. मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र काढण्याच्या कृतीचे त्यांनी समर्थन केले होते. त्याविरोधात मुंबईतील काही भागांतूनही संताप व्यक्त केला जात आहे. मुंबईतील नागपाडा आणि भेंडीबाजार भागात मॅक्रान यांचे छायाचित्रे रस्त्यावर काढण्यात आले होते. त्यापैकी दोन पोस्टर सुरक्षित राहिली होती. त्यातील एक पोस्टर आज सकाळी मुंबई पोलिसांनी पाणी टाकून खरवडून काढून टाकले होते.
भाजपकडून टीका
हेच फोटो ट्विट करत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी महाराष्ट्र सरकारला जाब विचारला होता. मुंबईच्या रस्त्यांवर फ्रान्सच्या अध्यक्षांचा अपमान का करण्यात येत आहे, असा प्रश्न त्यांनी महाराष्ट्र सरकारला केला आहे. त्यानंतर आता ठाण्यातही अनेक रस्त्यांवर फ्रान्सचे अध्यक्ष एमॅन्यूएल मॅक्रान यांचे पोस्टर चिकटवण्यात आली आहेत.