ठाणे - जागतिक आदिवासी दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी शहरात मोटारसायकल रॅली निघते. आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना या रॅलीचे आयोजन करते.
पोषमाता गावदेवी मंदीर-भाईंदर पाडा-नागरी बंदर तसेच जिल्ह्याधिकारी कार्यालय ते लोकमान्य नगर अशी भव्य मोटर सायकल रॅली निघते. रॅली दरम्यान ३ ठिकाणी तासभर विश्रांती घेतली जाते. या ठिकाणी आदिवासी बांधवांकडून पारंपरिक नृत्यासोबत विविध कला गुणांचे सादरीकरण केले जाते. आदिवासी समाजाच्या रुढी-परंपरा व चालीरिती याबाबत तरुणांना माहिती देण्यात येते.
ठाणे शहर हे चारही बाजूने जंगलाने वेढलेले आहे. या जंगलात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव राहतात. त्यांच्या पुढाकाराने ९ ऑगस्ट या आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.