ठाणे - आपल्या देशाने अहिंसेची लस टोचून घेतली. त्यामुळे आपला समाज नंपुसक झाल्याने लाज वाटायला पाहिजे, असे वक्तव्य करत अभिनेते शरद पोंक्षे यांनी हिंसेचे समर्थन केले आहे. तसेच त्यांनी महात्मा गांधी यांच्या अहिंसा परमोधर्म या विचाराची अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवली आहे. कल्याण येथील ओक हायस्कुलमध्ये ३१ वे अखिल भारतीय स्वा. सावरकार संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या समारोप सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, सावरकरही बोलायचे मला कधीच मुसलमानांची भीती वाटली नाही. मुसलमान एखाद्या कार्यक्रमात बोलताना भारत नव्हे तर हिंदुस्थानच म्हणतात. याचा अर्थ त्यांनीही मान्य केला की भारत हा देश हिंदुंचा आहे. 'शत्रुचा शत्रू आपला मित्र' हा उद्देश ठेवून ज्याच्यासोबत मैत्री केली तो नागच निघाला. माणसाने नागाला कितीही दूध पाजले तरीही तो डसणारच ! असे वादग्रस्त वक्तव्य करीत अभिनेता शरद पोंक्षे यांनी भाजप-शिवसेना फाटाफुटीत उडी घेतली. यावेळी व्यसपीठावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते माधव भंडारी, सावरकार अभ्यासक सच्चिदानंद शेवडे, कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार, माजी आमदार प्रभाकर संत आदी उपस्थित होते.
हेही वाचा - 'हिंदू महासभा-मुस्लीम लीग हे तर ब्रिटिशांचे चमचे'
पोंक्षे पुढे म्हणाले, मुख्यमंत्री पदावर दोन्ही पक्षांनी अस्तित्वाचा प्रश्न निर्माण केला. त्यामुळे आज वेगळीच मैत्री उदयास आली. यावर काल्पनिक कथा मांडून महापुरात जीव वाचविण्यासाठी ज्या झाडावर माणसू चढला होता. त्याच झाडावर नागही होता. या दोघांनाही जीव जाण्याच्या भीतीने मैत्री केली. मात्र, आज या मैत्रीत कटुता निर्माण झाली, असे सांगत त्यांनी भाजपला माणसाची तर शिवसेनेला नागाची उपमा दिली.