नवी मुंबई (ठाणे) - उन्हाळ्याचे दिवस असल्याने विजेची सर्वत्र मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भारनियमन केले जात आहे. विजेचा हा तुटवडा भरून काढण्यासाठी वाशी परिमंडळात वीज चोरांवर धडक कारवाई सुरु केली आहे. आतापर्यंत 1 हजार 553 विजचोरांवर कारवाई केल्याची माहिती महावितरण विभागाने दिली आहे. या कारवाईमुळे विजचोरांचे धाबे दणाणले आहे.
कोरोना काळात मीटर तपासणी करण्यावर होती बंदी -
कोरोनाच्या काळात घरोघरी जाऊन मीटर तपासणी करण्यावर ऑक्टोबर 2020पर्यंत बंदी असल्यामुळे महावितरणच्या वाशी मंडळ कार्यालयाने नोव्हेंबर 2020पासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वीज गळती रोखणे, वीज चोरी उघड करणे, सदोष मीटर तपासणे अशी महत्वाची कामे हाती घेतली. त्यामुळे नोव्हेंबर 2020 ते मार्च 2021काळात वाशी मंडळाने
विद्युत अधिनियम 2003 कलम 135 अन्वये वीजचोरीविरुद्ध 1 हजार191 प्रकरणात कारवाई केली आहे. तसेच 2 लाख 55 हजार 15 रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर कलम 126 अन्वये 362 वीजचोरी करणााऱ्यांना 126 अन्वयेे 1 लाख 9 हजार 97 रुपयांचा दंड वसूल केला आहे. एकूण 1 हजार 553 प्रकरणात 2 लाख 75 हजार 12 रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
हेही वाचा - नागपुरात संचारबंदीपूर्वी 2252 कोरोनाग्रस्तांची भर, आजपासून संचारबंदीला सुरूवात
विजचोरांचे दणाणले धाबे -
संबधित वीजचोरी प्रकरणे वाशी मंडळातील पनवेल, भिंगारी, नावडा, तळोजा, बेलापूर, वाशी, नेरुळ, घणसोली, ऐरोली या भागातील आहेत. महावितरण प्रत्येक महिन्याला करत असलेल्या कारवाईमुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहेत. यामुळे वीज गळती कमी होण्यास मदत होत आहे, अशी माहिती वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता, राजाराम माने यांनी दिली. संबधित कारवाई अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार असल्याचे माने यांनी सांगितले.
हेही वाचा - व्हीलचेअरवरुन ममता बॅनर्जी यांची डरकाळी; म्हणाल्या... 'जखमी वाघीण जास्त घातक, खेला होबे'