मीरा भाईंदर (ठाणे) - काशी मीरा गुन्हे शाखेच्या टीमने सोनसाखळी चोरणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे. या आरोपीकडून ३ लाखापेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपीने एकूण ७ सोनसाखळी चोरल्याचे उघड झाले आहे.
सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये झाली होती वाढ -
मीरा-भाईंदर परिसरामध्ये मागील काही महिन्यापासून दिवसा व रात्रीच्या वेळी मोटरसायकलवरून जबरीने सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. यासंदर्भात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. नयानगर पोलिसांना सुत्रांकडून या आरोपीसंदर्भात माहिती प्रात्प झाली. या माहितीच्या आधारे आरोपीला २६ एप्रिल २०२१ रोजी अटक करण्यात आली. त्याची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच हा चोरीचा माल त्याने सोनार काम करणाऱ्याला विक्री केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
सोनसाखळी चोरीचे सात गुन्हे उघड -
या आरोपीच्या चौकशीदरम्यान सोनसाखळी चोरीचे सात गुन्हे उघड झाले आहे. यामध्ये काशिमिरा पोलीस ठाण्यातील ३, मिरारोड पोलीस ठाण्यात २, कस्तुरबा पोलीस ठाणे १,समता नगर पोलीस ठाणे १ गुन्हा दाखल आहे. तसेच या आरोपीकडून 3 लाख 20 हजार रुपये किमतीचे १०१.३६० मिली ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ३५ हजार रुपये किंमतीची सुझुकी बर्गमन कंपनीची मोटर सायकल असा एकूण ३ लाख ५५ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा - लॉकडाऊनच्या धसक्याने सोलापुरात खरेदीसाठी तोबा गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा