ETV Bharat / state

Thane Crime: धावत्या लोकलमध्ये दिव्यांगाला पेटविणारा आरोपी अल्पवयीन - ट्रेनमध्ये दिव्यांगाला पेटविले

धावत्या लोकलमध्ये दिव्यांगाला पेटविणारा आरोपी हा अल्पवयीन आणि विकलांग असल्याचे समोर आलेले आहे. शनिवारी दाखल झालेल्या गुन्ह्यात ठाणे रेल्वे पोलिसांनी अवघ्या २४ तासात आरोपीला अटक केली. त्याच्यावर मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडरी कांदे यांनी दिली.

Thane Crime:
Thane Crime:
author img

By

Published : Mar 27, 2023, 11:05 PM IST

ठाणे: कळवा-मुंब्रा स्थानकाच्या दरम्यान शनिवारी दिव्यांग प्रमोद वाडेकर (३५) याच्या अंगावर पेटता रुमाल टाकला. यामुळे दिव्यांग वाडेकर हा जखमी झाला. त्याच्या डाव्या हाताला होरपळले. आग विझविण्याच्या खटाटोपात उजवा हात जखमी झाला. विकलांग अल्पवयीन आरोपीने मुंब्रा स्थानकावरून पोबारा केला. ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी आरोपीला २४ तासात बेड्या ठोकल्या. त्याच्या चौकशीत त्याच्यावर यापूर्वीच मोबाईल चोरीचे दोन गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. तर विकलांग आरोपी हा नशेडी असून नशेची झिंग पुरविण्यासाठी तो सोल्युशन या ज्वलनशील पदार्थाचा वापर करीत होता. घटनेच्या दिवशी त्याच्याकडे नशेसाठी असलेले सोल्युशन रुमालावर टाकून पेटवून रुमाल दिव्यांग वाडेकर याच्या अंगावर टाकला आणि घटना घडली.

चोरी करताना अपंगत्व आले: मुंब्रा स्थानकावरून आरोपी याने पलायन केल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांना फिर्यादी दिव्यांग प्रमोद वाडेकर यांनी दिली. वाडेकर यांनी केलेल्या वर्णनावरून लोहमार्ग पोलिसांचा तपास सुरु झाला. मुंब्रा स्थानकावरील सिसितीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा मागोवा ठाणे लोहमार्ग पोलिसांनी घेत पोलीस संभावित ठिकाणी भिवंडीत पोहचले. तांत्रिक अभ्यास आणि सीसीटीव्हीच्या मदतीने ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अखेर आरोपीला अटक केली. अल्पवयीन विकलांग आरोपी विरुद्ध रेल्वे पोलीस ठाण्यात दोन मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे वापोनि पंढरी कांदे यांनी सांगितले. तर मोबाईल चोरी करताना त्याला अपघातात आपला पाय गमवावा लागला असल्याचेही समोर आले.

रेल्वे स्थानक परिसरात अत्याचार: रेल्वेत यापूर्वीही गुन्हे घडले आहेत. पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात एका तीन वर्षीय चिमुरडीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी त्या नराधमांस पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. तीन वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करणारा नराधम हा फिरस्ता आहे. तो बाटल्या गोळा करण्याचे काम करतो, त्याला नवी मुंबईतील जुईनगर परिसरातुन ताब्यात घेतले आहे. पीडित अल्पवयीन मुलीवर मुंबई येथील जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा: CM Eknath Shinde Profile Photo : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बदलला 'डीपी'; म्हणाले, आम्ही सारे....

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.