नवी मुंबई - नवी मुंबईतील ठाणे-बेलापूर मार्गावरील महापे भुयारी मार्ग येथे शिवशाही बसला अपघात झाला असून यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती माहिती तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यातून मिळाली.
ठाणे-बेलापूर मार्गावरील म्हापे भुयारी मार्गात ठाण्यावरून अमरावतीच्या दिशेला जाणाऱ्या शिवशाही बसला आज (रविवार) सकाळी साडेसात वाजता अपघात झाला आहे. रस्त्यावर पाणी असल्याने चालकाने ब्रेक दाबल्यामुळे बस डिव्हायडरला जाऊन धडकून हा अपघात झाला. यामध्ये बस चालकाच्या, पायाला मार लागला आहे. मात्र, सुदैवाने कोणत्याही प्रकारे जीवितहानी झाली नसून कोणीही या घटनेत गंभीर जखमी झाले नसल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिसांच्या माध्यमातून मिळाली आहे. या भुयारी मार्गाचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून केले आहे.
21 मे, 2018 ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गाचे उद्घाटन केले होते. भुयारी मार्गाचे काम व्यवस्थित न झाल्याने या मार्गावर सतत पाण्याची गळती होत असते त्यामुळे या रस्त्यावर अनेक अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत.
हेही वाचा - ठाण्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त, अजित पवारांच्या प्रतिमेला जोड्याने मारले