ठाणे - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात शून्य कचरा मोहीम राबविण्यास प्रारंभ झाला. या मोहिमेच्या वर्षपूर्तीनंतर आधारवाडी येथील डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकणे बंद करण्यात आले आहे. आता याठिकाणी असलेला सगळा कचरा बायोमायनिंग पद्धतीने हटविला जाईल. त्यानंतर या जागेवर उद्यान, सायकलिंग ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक विकसित केला जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
जनजागृतीमुळे शुन्यकचरा मोहिम सफल
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी विभागामार्फत शून्य कचरा मोहीम 25 मे 2020 पासून राबविण्यात सुरुवात केली. कोविड कालावधीत सदर मोहीम राबवताना सुरुवातीला नागरिकांकडून, लोकप्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. परंतु उपायुक्त कोकरे यांनी त्यांच्या घनकचरा विभागातील पथकामार्फत याबाबत जनजागृती करण्यासाठी 200 कार्यशाळा, 50 व्हिडिओ कॉन्फरन्स आणि 10 वेळा फेसबुकवर लाईव्ह करत नागरिकांशी संवाद साधला. त्याचप्रमाणे घनकचरा विभागामार्फत गृहनिर्माण सोसायटीमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन, तेथे बैठकांच्यामार्फेत कचरा वर्गीकरण करण्याची पद्धत समजावून सांगण्यात आली. महानगरपालिकाकडे असलेली कचरा संकलनाची वाहने व कर्मचारी यांचे योग्य व्यवस्थापन करण्यात येते. आठवड्यातील रविवार, बुधवार या दोन दिवशी फक्त सुका कचरा उचलण्याची पद्धत अवलंबण्यात आली. ओला कचरा आणि सॅनेटरी नॅपकिन हे दररोज उचलण्यात येऊ लागल्यामुळे कचऱ्याचे वर्गीकरण करणे सुलभ झाले.
प्लास्टिकवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात महापालिकेला यश
प्लास्टिक हे पर्यावरण रक्षणासाठी मोठ्या प्रमाणात हानिकारक असल्यामुळे स्वच्छता मार्शल यांच्यामार्फत प्लास्टिक वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊ लागली. त्याचप्रमाणे दर रविवारी प्लास्टिक संकलन केंद्रामार्फत प्लास्टिक संकलनाची व्यवस्था करण्यात आली. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे, दुसऱ्या रविवारी कापड, गाद्या, जुने कपडे, तिसरा रविवारी काच व कागद, चौथा रविवारी चप्पल बूट फर्निचर इत्यादी वस्तूंच्या संकलनासाठी संकलन केंद्र तयार करण्यात आले. 5 किलो प्लास्टिकच्या बदल्यात एक वेळेची पोळी-भाजीची अभिनव संकल्पनादेखील महापालिकेमार्फत सुरु करण्यात आली. या सर्व बाबींमुळे प्लास्टिकवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात महापालिकेला यश मिळाले आहे.
डंम्पिगच्या १६ एकरच्या भूखंडावर उद्यानासह सायकलिंग व जॉगिंग ट्रॅकही
जवळपास १६ एकरच्या आसपास ही जमीन आहे. त्यावर आजमितीस २१ घनमीटर टन इतका कचरा आहे. त्यापैकी १० घनमीटर टन कचऱ्यापासून कम्पोस्ट खत तयार केले जाऊ शकते. तर अविघटनशील कचरा भिवंडी येथील एका दगडखाणीत बायोमायनिंग केला जाईल. ही जागा मोकळी झाल्यावर खाडीकिनारी रिव्हर फ्रंट विकसित करायचा आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत या जागेत उद्यान, सायकलिंग ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक विकसित केले जाणार आहे. आता कचरा हा उंबर्डे आणि बारावे घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी पाठविला जाणार आहे. ५० टन ओल्या कचऱ्यावर पाच ठिकाणी असलेल्या बायोगॅस प्रकल्पात प्रक्रिया केली जात आहे. बारावे प्रकल्पाच्या संदर्भातील हरित लवादाकडे असलेली याचिका लवादाने निकाली काढली आहे. डोंबिवलीतही ५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी एक संस्था पुढे आली आहे. त्या ठिकाणी महापालिकेस काही खर्च करायचा नाही. महापालिका संबंधित संस्थेला केवळ कचरा प्रक्रियेसाठी देणार आहे. काही बड्या सोसायट्या ५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करीत आहेत.
कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर आता फुलणार नंदनवन - आधारवाडी डंम्पिग ग्राऊंड लेटेस्ट न्यूज
घनकचरा विभागामार्फत गृहनिर्माण सोसायटीमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन, तेथे बैठकांच्यामार्फेत कचरा वर्गीकरण करण्याची पद्धत समजावून सांगण्यात आली. तसेच महानगरपालिकाकडे असलेली कचरा संकलनाची वाहने व कर्मचारी यांचे योग्य व्यवस्थापन करण्यात येते.