ठाणे :छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे, कार्याचे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात कौतुक होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मांडणारी अनोखी कला आज साकारण्यात आली आहे. शिवजयंती निमित्त लाकडाच्या तुकड्यावर महाराजांचे नाव कोरले असून त्यात पुस्तके ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या अनोख्या कलाकृतीचा आविष्कार पाहण्यासाठी शिवपेमी येथे गर्दी होत आहे.
4 फूट लांबी, 40 फूट रुंदीचा ग्रंथ आराखडा : आज महाराष्ट्रासह देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे. प्रत्येकजण छत्रपती शिवाजी महाराजांचा वेगवेगळ्या पद्धतीने विचार मांडून त्यांचा सन्मान करत आहे. परंतु कल्याण पूर्व येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या माध्यमातून जरीमरी मंदिर तिसगाव येथे 4 फूट लांबी, 40 फूट रुंदीचा ग्रंथ आराखडा तयार करण्यात आला आहे. अंदाजे 3 हजार पुस्तके ठेवण्याची यात व्यवस्था आहे. यावेळी नागरिकांनी वाचनीय, शालेय उपयुक्त पुस्तके आणावीत, असे आवाहन मंडळाने केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत कालपासून अनेक नागरिकांनी या ले-आऊटमध्ये पुस्तके आणली असून ही मांडणी अतिशय रेखीव दिसत आहे.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड दखल घेणार : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या या मांडणीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही घेणात येईल, असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर या मांडणीत ठेवण्यात आलेली पुस्तके गरजू विद्यार्थ्यांना किंवा सेवाभावी संस्थांना मोफत दिली जाणार असल्याचेही संस्थेने नमूद केले आहे. आखिव आणि रेखीव असलेल्या या मंडणीवर कोरलेल्या महाराजांच्या नावामुळे ही मांडणी अधिक उठावदार दिसत आहे. ही मांडणी पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी कल्याण पूर्व येथील तीसाई देवी मैदानावर गर्दी केली असून महाराजांच्या विचाराला खऱ्या अर्थाने मुजरा करण्यात आला असल्याची चर्चा शहरभर रंगली आहे.
हेही वाचा - Uddhav thackeray on Amit Shah : अमित शाह यांनी दूधात मिठाचा खडा टाकला; उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र