ठाणे- नागरिकत्व कायद्याबाबत देशभरात विरोध होत आहे. मात्र, परिसंवादाच्या माध्यमातून नागरिकांना कायद्याचे फायदे-तोटे समजविण्यासाठी ठाण्यातील सहयोग मंदिर हॉल येथे नीती परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात नागरिकांना नागरिकत्व कायद्या सुधारणेमागील आक्षेप आणि वस्तुस्तिथीबाबत माहिती देण्यात आली.
सृजन आणि दीनदयाळ प्रेरणा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी ठाण्यातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. कार्यक्रमाला वक्ते म्हणून निवृत्त लेफ्टिनंट जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर, अँड. प्रवर्तक पाठक आणि भाजप खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी नागरिकांना संबोधित केले. एकीकडे देशांमध्ये एनआरसी आणि नागरिकत्व सुधारणा कायदा याबाबत गदारोळ पेटून उठला असताना आता भाजपाकडून हा कायदा कसा आहे, त्याचे फायदे तोटे काय, हे समजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी अशा पद्धतीच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात येत आहे. नागरिकांपर्यंत पोहोचून कायद्याबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हेही वाचा- खळबळजनक ! खेळण्याच्या बहाण्याने नेवून बाळाची विक्री, माय-लेकावर गुन्हा