ETV Bharat / state

Rape of a Married Woman: अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर नातेवाईकाचा वारंवार बलात्कार - Rape Case In Kulgaon Badlapur Area

एका ३२ वर्षीय विवाहितेला तिचा अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, ४८ वर्षीय नातेवाईकाने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ( Rape Case In Kulgaon Badlapur Area ) याप्रकरणी कुळगाव पोलीस ठाण्यात अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून आरोपी नातेवाईकाला पोलिसांनी अटक केली आहे.

कुळगांव पोलीस ठाणे
कुळगांव पोलीस ठाणे
author img

By

Published : Aug 5, 2022, 5:08 PM IST

ठाणे - पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार ३२ वर्षीय पीडित विवाहिता पतीसह कुळगाव-बदलापूर भागात राहते. तर, आरोपी नातेवाईकही याच परिसरात राहतो. तो एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत आहे. तसेच, दोघे नातेवाईक असल्याने एकमेकांच्या घरी येणे - जाणे होते. त्यातच काही महिन्यापूर्वी आरोपी नातेवाईकाने पीडितेच्या न कळत तिचा अश्लील फोटो मोबाईलमध्ये काढला होता.

अनेकवेळा बलात्कार - हाच फोटो व्हायरल करण्याची विवाहित पीडितेला धमकी देऊन शारीरिक संबध ठेवण्यास तगादा लावला होता. दुसरीकडे समाजात बदनामी होईल या भीतीपोटी विवाहिता भयभीत होऊन त्याने सांगिलेल्या एका ठिकाणी भेटण्यासाठी गेली असता, आरोपी नातेवाईकाने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतरही फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी विविध ठिकाणी बोलवून पीडितेवर बलात्कार करत होता.

आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी - दरम्यान पीडितेच्या पतीला या घटनेची माहिती मिळताच पीडित पत्नी घेऊन त्यांनी कुळगाव पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पीडितेने तिच्यावर घडललेल्या प्रसंगाचे कथन करताच पोलिसांनी पिडतेच पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी नातेवाईकावर अत्याचारासह विविध कालमानानुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु असता काही तासातच आरोपीला कुळगाव परिसरातून बेड्या ठोकल्या. आज ५ ऑगस्ट रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भोई यांनी दिली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास पोलिसांनी सुरु केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

हेही वाचा - विनायक राऊत दहावी दोनदा नापास; त्यांनी कायदा शिकवला तर, महाराष्ट्र संकटात

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.