ETV Bharat / state

'तो' लग्न सोहळा ठरला कल्याण डोंबिवलीसाठी धोक्याचा

सर्व नागरीकांनी घाबरून न जाता सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्‍यास त्‍वरीत महापालिकेच्‍या रुग्‍णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. लवंगारे यांनी केले आहे.

author img

By

Published : Apr 2, 2020, 8:38 PM IST

corona thane
प्रतिकात्मक

ठाणे- संचारबंदी असतानाही डोंबिवलीत पार पडलेला 'तो' लग्न सोहळा कल्याण डोंबिवलीकरांचे जीव धोक्यात घालणारा ठरला आहे. या लग्न सोहोळ्याला उपस्थित असलेल्यांपैकी ३ नवे कोरोना बाधित रुग्ण, तर एक रूग्‍ण कोरोना बाधित रुग्णाचा सहवासित असल्याचे समोर आले आहे. तर, अजून एक रुग्‍ण कल्‍याण पूर्व भागात आढळल्याने रुग्णांची संख्या ५ वर येऊन ठेपली आहे. त्यामुळे, आता महापालिका क्षेत्रातील कोरोना बाधित रुग्णांची संख्‍या १९ च्या घरात पोहोचली आहे.

आज आढळून आलेल्या नवीन रुग्‍णांपैकी ४ रुग्‍ण हे डोंबिवली पूर्व भागातील असून १ रुग्‍ण कल्‍याण पूर्व भागातील आहे. डोंबिवली येथील ३ रुग्‍ण हे लग्‍न सोहळ्याशी संबधीत असून १ रुग्‍ण कोरोना बाधित रुग्‍णाचा सहवासित आहे. नवीन रुग्‍णांपैकी कल्‍याण पूर्व येथील रुग्‍ण हा एका खाजगी रुग्‍णालयात उपचार घेत असून डोंबिवली येथील ४ रुग्‍ण मुंबईतील कस्‍तुरबा रुग्‍णालयात उपचार घेत आहेत. कल्‍याण शहरात प्रथम आढळलेला कोरोना बाधित रुग्‍ण व त्‍याचे दोन कुटुंबिय उपचारांती पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्‍या कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील पुनर्तपासणीअंती सुट्टी दिलेल्‍या रुग्‍णांची संख्‍या आता ४ झाली आहे.

सद्यःस्थितीत महापालिका क्षेत्रातील एकूण १५ कोरोनाबाधित रुग्‍ण रूग्‍णालयात उपचार घेत आहेत. कल्‍याण डोंबिवली महापालिकेमार्फत महापालिकेचे शास्‍त्रीनगर सामान्‍य रुग्‍णालय हे विलगीकरण रुग्‍णालय म्‍हणून घोषित केले असून महापालिका क्षेत्रातील संशयित रुग्‍णांना तेथे दाखल करुन घेण्‍यात येणार आहे. सर्व नागरीकांनी घाबरुन न जाता सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्‍यास त्‍वरीत महापालिकेच्‍या रुग्‍णालयाशी संपर्क साधावा, असे अहवान वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. लवंगारे यांनी केले आहे.

हेही वाचा- नवी मुंबईत संचारबंदी तोडणाऱ्यांना पोलिसांचा दणका, तब्बल दोनशे दुचाकी जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.