ETV Bharat / state

आई-बहिणीला पाण्यात बुडताना वाचविणारी मुलगी खदानीत बेपत्ता

author img

By

Published : Dec 27, 2020, 8:36 PM IST

Updated : Dec 27, 2020, 9:23 PM IST

डोंबिवली नजीकच्या कोळेगाव परिसरातीळ एका खदानीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या आई आणि लहान बहिणीला पाण्यात बुडताना पाहून 16 वर्षीय मोठ्या मुलीने दोघांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. दोघींना वाचविण्यात तिला यश आले. मात्र, तीच पाण्यात बेपत्ता झाल्याने तिचा शोध सुरू आहे.

लावण्या
लावण्या

ठाणे - डोंबिवली नजीकच्या कोळेगाव परिसरातीळ एका खदानीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या आई आणि लहान बहिणीला पाण्यात बुडताना पाहून 16 वर्षीय मोठ्या मुलीने दोघांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. धक्कादायक बाब म्हणजे या दोघींनी वाचवण्यासाठी तीने पाण्यात उडी घेतली. तर या घटनेत आई आणि लहान मुलीला वाचवण्यात यश आले असून मोठी मुलगी पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे. लावण्या शेट्टी (वय 16 वर्षे) असे पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर आई गीता शेट्टी आणि मुली परी (वय 4 वर्षे) असे बचावलेल्या माय-लेकींची नावे आहेत.

घटनास्थळ

लहान‘परी’चा पाण्यात घसरला पाय आणि घडली दुर्घटना

मानपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आई गीता आपल्या दोन मुलींसह कपडे धुण्यासाठी रविवारी (दि. 27 डिसें.) दुपारच्या सुमारास कोळेगाव परिसरात असलेल्या खदानीत गेली होती. त्यावेळी खेळता-खेळता लहान मुलगी परीचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली. अशात आपल्या लेकीला वाचवण्यासाठी पोहता येत नसतानाही आई गीता हिने पाण्यात उडी घेतली. परी आणि गीता दोघींना पाण्यात पोहता येत नसल्याने लावण्या घाबरली आणि तिने त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. लावण्याने मोठ्या हुशारीने आई आणि परीचा जीव वाचवला. पण, दुर्देवाने ती पाण्याच्या प्रवाहात अडकल्याची माहिती देण्यात आली आहे.

अंधार पडल्याने शोधकार्य थांबले

मानपाडा पोलीस घटनास्थळी पोहोचून लावण्या हीचा शोध घेत आहेत. आई गीता आणि बहिण परी सुखरुप असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. तर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले खदानीच्या साचलेल्या पाण्यात शोध घेत आहेत. मात्र, सायंकाळच्या सुमारास अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले आहे. तर दुसरीकडे आई आणि बहिणीला वाचवून स्वत: मात्र पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता झाल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा - ठाण्यात मोबाईल चोरी प्रकरणी 2 जणांना अटक; गुन्हे शाखा व नवघर पोलिसांची कारवाई

हेही वाचा - कल्याण : पत्री पुलाचे काम प्रगतीपथावर, नव्या वर्षात नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्याता

Last Updated : Dec 27, 2020, 9:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.