ETV Bharat / state

संचारबंदीच्या काळात मानवी वस्तीत वाढला नागांचा शिरकाव - पार्किंगमध्ये कोब्रा

आधारवाडी परिसरातील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये भक्ष्य शोधण्यासाठी एक कोब्रा नाग शिरला होता. तर कोळीवली गावातील एका घरासमोर असलेल्या पार्किंगमध्ये कोब्रा नाग आढळला. त्याला सर्पमित्राने पकडले.

कोब्रानाग
कोब्रानाग
author img

By

Published : Apr 7, 2020, 3:49 PM IST

ठाणे - संचारबंदीच्या काळात भक्ष्य शोधण्यासाठी कोब्रा नागांचा शिरकाव कल्याण पश्चिमकडील मानवी वस्तीत वाढला असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. वार संस्थेच्या सर्पमित्रांनी २ कोब्रा जातीचे नाग मानवी वस्तीतून पकडल्याची घटना समोर आहे.

कोरोनाच्या पार्शवभूमीवर टाळेबंदी आहे. त्यातच तापमानाचा पारा वाढत असल्याने शहरालगत असलेल्या शेती-जगंल परिसरातील विषारी सापांनी भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत शिरकाव केला आहे. आज दुपारच्या आधारवाडी परिसरातील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये भक्ष्य शोधण्यासाठी एक कोब्रा नाग शिरला होता. तर कोळीवली गावातील एका घरासमोर असलेल्या पार्किंगमध्ये कोब्रा नाग दडून बसला होता. सर्पमित्र हितेश याला माहिती मिळताच घटनस्थळी जाऊन या दोन्ही कोब्रा नागांना शिताफीने पकडून पिशवीत बंद केले. दरम्यान, या दोन्ही नागांना कल्याणच्या वन अधिकाऱ्यांच्या परवानगीने उद्या सायंकाळपर्यंत निसर्गाच्या सान्निध्यात सोडणार असल्याची माहिती, सर्पमित्र हितेश यांनी दिली आहे.

हेही वाचा - हातावर पोट असलेल्यांना मदतीचा हात, ठाण्यातील युवक देताहेत भुकेल्यांना घास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.