ETV Bharat / state

Woman Murder in Thane : डोंबिवलीत घरात घुसून ५८ वर्षीय महिलेची हत्या; परिसरात खळबळ - thane latest news

घरात घुसून अज्ञात मारेकऱ्याने एका ५८ वर्षीय महिलेची हत्या केल्याची धक्कादायक ( woman Murder in Dombivli ) घटना समोर आली आहे. ही घटना डोंबिवली पूर्व परिसरात असलेल्या टिळक नगर चौकातील आनंद शीला या सोसायटीत घडली आहे.

Woman Murder in Thane
ठाण्यात महिलेची हत्या
author img

By

Published : Jan 17, 2022, 2:41 PM IST

ठाणे - घरात घुसून अज्ञात मारेकऱ्याने एका ५८ वर्षीय महिलेची हत्या केल्याची धक्कादायक ( woman Murder in Dombivli ) घटना समोर आली आहे. ही घटना डोंबिवली पूर्व परिसरात असलेल्या टिळक नगर चौकातील आनंद शीला या सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून त्या अज्ञात मारेकऱ्यांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. विजया बावीस्कर (वय ५८) असे हत्या झालेल्या या महिलेचे नाव आहे.

घरकाम करणाऱ्या महिलेमुळे उघडकीस आली घटना -

विजया ह्या टिळक नगर चौकातील आनंद शीला या सोसायटीच्या एका घरात एकट्याच राहत होत्या. रात्रीच्या सुमारास घरात घुसून या महिलेची गळा आवळून हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यातच सकाळी घरकाम करणारी महिला मृतक विजया यांच्या घरात आली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती टिळक नगर पोलीस ठाण्याला दिली असून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत विजया यांचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी महापालिकेच्या शासकीय रुग्णालयात रवाना केला.

हेही वाचा - Post Covid Parosmia : पोस्ट कोविडने दुर्गंंधीत केले आयुष्य; तरुण 9 महिन्यापासून खातोय वरणभात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.