ठाणे : मागील बारा वर्षापसून ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे रखडले होते. ते आता पूर्णत्वास जाणार आहे. कारण या मार्गिकेचे काम जानेवारीपर्यंत पूर्ण केले जाणार असल्याची महिती मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने ( MRVC ) दिली आहे. तसेच मार्च 2022 नंतर मुंबई उपनगरीय लोकल सेवेत ( Mumbai Suburban Local Service ) दाखल होणाऱ्या लोकल ट्रेन ह्या फक्त एसी लोकल ( Local AC Train ) असणार अशी माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर सीएसएमटी ते कल्याण दरम्यान जलद मार्गावरील प्रवाशांच्या साेयीसाठी मार्च महिन्यापासून एसी लाेकल धावणार आहेत.
80 अतिरिक्त लोकल फेऱ्या -
गेल्या बारा वर्षापासून ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम रखडले आहे. मात्र, आता ठाणे-दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम जानेवारी अखेरीसपर्यंत पूर्ण होईल, असा दावा मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन ( MRVC) कडून करण्यात आला आहे. त्यानुसार या मार्गाचे काम पुर्ण कऱण्यावर एमआरव्हीसीने भर दिला आहे. त्यासाठी माेठे ब्लॉक घेण्यात येत आहेत. या कामाबरोबर लोकलच्या प्रवाशांसाठी अजून एक आनंदाची बातमी आहे. हे काम पूर्ण झाल्यास लोकल फेऱ्या वाढणार आहेत. याबाबत आज मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ठाणे ते दिवा दरम्यानचा पाचवा-सहावा रेल्वेमार्ग पुर्णत्वास आल्यानंतर यावरुन लाेकलच्या 80 अतिरिक्त फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. तसेच मार्च 2022 नंतर मुंबई उपनगरीय लोकल सेवेत दाखल होणाऱ्या लोकल ट्रेन ह्या फक्त एसी लोकल असणार आहेत. त्याचबरोबर सीएसएमटी ते कल्याण ( CSMT to Kalyan ) दरम्यान जलद मार्गावरील प्रवाशांच्या साेयीसाठी मार्च महिन्यापासून एसी लाेकल धावणार आहेत.
लाेकलच्या वेळापत्रकाला लेटमार्क लागणार -
नविन वर्षात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात तीन मोठे ब्लॉकचे नियाेजन ( Large block management ) मध्य रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळ करीत आहे. हे ब्लॉक 24, 36 आणि 72 तासांचे असणार आहेत. तसेच 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान 72 तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. ठाणे ते दिवा हा मार्ग नविन वर्षात प्रवाशांच्या साेयीसाठी खुला करण्यात येणार आहे. हा मार्ग पुर्ण झाल्यानंतर कुर्ला ते दिवा दरम्यान उपनगरीय लाेकल आणि मेल-एक्सप्रेस वेगवेगळ्या मार्गावरुन चालविणे शक्य हाेणार आहे. त्यामुळे लाेकलच्या वेळापत्रकाला लेटमार्क लागणार नाही.
Thane-Diva: खूशखबर ; मार्च 2022 पर्यंत ठाणे-दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर धावणार 80 लोकल ट्रेनच्या फेऱ्या - लोकल एसी ट्रेन न्यूज
बहुप्रतिक्षीत असलेल्या ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात पूर्ण होणार आहे. या नवीन मार्गावर नव्याने 80 लोकल फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. नव्याने उपनगरीय सेवेत दाखल होणाऱ्या लोकल ट्रेन या एसी लोकल ( Local AC Train ) असणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (General Manager of Central Railway) अनिल कुमार लाहोटी यांनी दिली आहे. त्यामुळे आता मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांचा प्रवास हा गारेगार होणार आहे.