ETV Bharat / state

ठाणे जिल्ह्यात तब्बल 72 हजार मतदान नोटाला; उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीला फटका - नोटा मतदान ठाणे

उमेदवार पसंतीचा नसेल तर मतदान यंत्रावर नोटा हा पर्याय असतो. यंदाच्या निवडणुकीत ठाण्यात तब्बल 72 हजार मतदारांनी हा पर्याय निवडला आहे. या नोटा पर्यायाचा फटका उल्हासनगर मतदार संघातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसल्याचे बोलले जात आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Oct 25, 2019, 11:51 PM IST

ठाणे - जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात पार पडलेल्या निवडणुकांमध्ये नोटाची चलती दिसून आली. उमेदवार पसंतीचा नसेल तर मतदान यंत्रावर नोटा हा पर्याय असतो. यंदाच्या निवडणुकीत ठाण्यात तब्बल 72 हजार मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला आहे.

हेही वाचा - ऐरोलीसह बेलापूर मतदारसंघातील मतदानाच्या घटलेल्या टक्केवारीचा फायदा युतीला?

या नोटा पर्यायाचा फटका उल्हासनगर मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी अवघ्या 2 हजार मतांनी पराभूत झाल्या आहेत. या मतदार संघात 4 हजार 978 जणांनी नोटा पर्याय स्वीकारला आहे. या विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच 6 हजार 82 जणांनी नोटा पर्याय स्वीकारलला आहे. ज्योती कलानी उभ्या असलेल्या उल्हासनगर मतदारसंघात भाजपचे कुमार आयलानी निवडून आले असून येथे 4 हजार 978 मतदारांनी नोटा पर्यायाचा वापर केल्याचे उघड झाले आहे.

Intro:ठाणे जिल्ह्यात तब्बल 72 हजार नोटा - नोटामुळे उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीला फटकाBody:

ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघात पार पडलेल्या निवडणुकीमध्येही नोटाची चलती दिसून आली.उमेदवार पसंतीचा नसेल तर मतदान यंत्रावर असलेला नोटा हा पर्याय तब्बल 72 हजार मतदारांनी बजावला आहे.दरम्यान,या नोटा पर्यायाचा फटका उल्हासनगर मतदार संघातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसला असून राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी अवघ्या 2 हजार मतांच्या फरकाने पराभूत झाल्या आहेत.या मतदार संघात 4 हजार 978 जणांनी नोटा पर्याय स्वीकारला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी युती - आघाड्या करून तसेच,ऐन निवडणुकीच्या तोंडावर या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणाऱ्या उमेदवारांना चपराक लगावणारे निकाल लागले आहेत.राजकारण्यांच्या या दलबदलूपणाला कंटाळलेल्या मतदारांनी नोटा चा पर्याय स्वीकारल्याचे दिसून येत आहे.या विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघात एकूण 72 हजार 31 जणांनी नोटा पर्यायाचा वापर केला.यात सर्वाधिक म्हणजेच 6 हजार 82 जणांनी नोटा पर्याय कल्याण ग्रामीण मतदार संघात स्वीकारलला आहे.तर,नोटा पर्यायामुळे उलहसनगरमधील राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी याना अवघ्या 2 हजार मतांनी पराभवाचा सामना करावा लागला.या मतदार संघात भाजपचे कुमार आयलानी निवडून आले असून येथे 4 हजार 978 नोटा पर्यायाचा वापर केल्याचे उघड झाले आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.