ETV Bharat / state

आता ठाण्यावर राहणार ६००० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 14, 2024, 10:44 PM IST

cctv cameras in city : सुरक्षितेच्या दृष्टीने ६००० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठाणे शहरावर राहणार आहे. यामुळं गुन्हेगारीला आळा बसेल असं मत जाणकारांनी व्यक्त केलंय.

Thane News
६००० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

ठाणे cctv cameras in city : मुंबईच्या धरतीवर आता ठाण्यात देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे दाट जाळे विणले जाणार आहे. कारण ६०५१ सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मंजुरी नुकतीच देण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक चौक आणि रस्ता या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत येणार असून नागरिकांची प्रत्येक कृती कॅमेरात कैद होणार आहे. एवढ्या कॅमेऱ्यांचे दाट जाळे विणल्याने असामाजिक कृत्य करणाऱ्यांवर चाप बसेल आणि दहशत निर्माण होईल, असं मत जाणकारांनी व्यक्त केलंय.

ठाण्याच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह : स्मार्ट ठाणे, तलावांचे ठाणे अशी अनेक बिरुदे मिळवणारे ठाणे आता मुख्यमंत्र्यांचे ठाणे म्हणून प्रसिद्ध झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे ठाणे येथील रहिवासी असून ठाणे हा त्यांचा बालेकिल्ला समजला जातो. परंतु गेल्या काही काळामध्ये ठाण्यातील गुन्हेगारी आणि रात्रीच्या अंधारात केलेली असमाजिक कृतीमुळं ठाण्याच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. हा विषय अत्यंत गंभीरतेने घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात तब्बल ६०५१ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश दिले आहेत.

'हर घर कॅमेरा' संकल्पना : शहरातील प्रत्येक चौक, मुख्य रस्ते आणि गल्ल्या देखील या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कक्षेत येणार आहेत. सर्व काही यात टिपले जाईल आणि गुन्हेगारीवर आळा बसेल असं मत जाणकार व्यक्त करतात. आताच्या घडीला ठाणे शहरापासून उल्हासनगर, कल्याण, भिवंडी या भागांसह आयुक्तालयात एकूण ९५० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. महत्त्वाचं म्हणजे २०१६ साली मुंबई महानगरपालिकेने पंधराशे ठिकाणी तब्बल ५००० कॅमेरे बसवले होते. त्या तुलनेत ठाणे महानगरपालिकेने साडेतीनशे कॅमेरे बसवले होते. त्यामधील केवळ १५० कॅमेरे सुस्थितीत आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे 971 कॅमेरे असून त्यातील केवळ 750 कॅमेरे काम करत आहेत. शहरातील नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता, गेल्या वर्षी ठाणे पोलिसांनी 'हर घर कॅमेरा' ही संकल्पना राबवत नागरिकांना घराबाहेर कॅमेरे बसवण्याची विनंती केली होती. ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त जयजितसिंग यांनी गेल्याच वर्षी शहरात बऱ्याच ठिकाणी कॅमेरे बसवण्याची मागणी केली होती.

अनुभवातून मिळाला धडा ठेवले जाणार विशेष लक्ष : 2008 मध्ये मुंबईवर २६/११ चा दहशतवादी हल्ला झाला. या देशाच्या आर्थिक राजधानीची सुरक्षितता किती याचा प्रत्यय सगळ्यांना आला. पुन्हा असा प्रसंग येऊ नये यासाठी मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरे सीसीटीव्हीने सुसज्ज व्हावी, त्यासाठी २०११ मध्ये एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून २०१६ साली मुंबईतील पंधराशे ठिकाणी पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा समितीने सुरक्षा सुधारणांचा भाग म्हणून ठाणे पोलीस आयुक्तालयाचा समावेश करून घेतला. यापूर्वी ठाणे पोलीस आयुक्तालयाने १७४५ ठिकाणी तब्बल ५४६८ कॅमेरे बसवण्याची शिफारस केली होती. अखेर समितीच्या आदेशाच्या आधारे राज्याच्या गृह विभागाने या आठवड्याच्या सुरुवातीलाच ४९२ कोटी रुपयांचे ६०५२ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.

हेही वाचा -

  1. उपराजधानीतील 3500 सीसीटीव्हीचा अॅक्सेस बंद, न्यायालयाने केली मध्यस्थी
  2. पावसाळ्यात घाटातील रेल्वे वाहतुकीवर 145 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची असणार नजर
  3. CCTV : मुंबईतील रेल्वे स्थानकांवर एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे लागणार; सुरक्षा व्यवस्था होणार बळकट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.