ETV Bharat / state

COVID-19 : केंद्रीय सुरक्षा बलाच्या आणखी 6 जवानांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह, एकूण 11 जण बाधित - corona effect

केंद्रीय सुरक्षा बलाच्या जवानांना तत्काळ विलगीकरणात ठेवल्यामुळे संभाव्य धोका केवळ प्रशासनाच्या निर्णयामुळे कमी झाला असून एमजीएम हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र दोन विंग तयार करण्यात आल्या आहेत. त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत.

केंद्रिय सुरक्षा बल
केंद्रिय सुरक्षा बल
author img

By

Published : Apr 4, 2020, 10:18 AM IST

नवी मुंबई - केंद्रीय सुरक्षा बलाच्या 5 जवानांची कोविड-19 टेस्ट यापूर्वी पॉझिटिव्ह आढळून आली होती. या जवानांना खारघर येथील 139 अधिकारी आणि सेवेसाठी नियुक्त केले होते. आता आणखी 6 जवानांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे कोरोनाची लागण झालेल्या जवानांता आकडा वाढून तो 11 वर पोहोचला आहे.

याआधी 5 जवानांचा कोरोनाची लागण झालेल्याचे समोर आल्यानंतर त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले होते. तसेच, त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांचेही विलगीकरण केले होते. कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी तातडीने आदेश काढून 146 अधिकारी व कर्मचा-यांना महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल कळंबोली येथे स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्याचे आदेश दिले केले होते. तात्काळ त्यांची कोविड-19 टेस्ट घेण्यात आली होती यापैकी 6 जवानांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे.

केंद्रीय सुरक्षा बलाच्या जवानांना तत्काळ विलगीकरणात ठेवल्यामुळे संभाव्य धोका केवळ प्रशासनाच्या निर्णयामुळे कमी झाला असून एमजीएम हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र दोन विंग तयार करण्यात आल्या आहेत. त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत.

विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी या प्रकरणी विशेष लक्ष घातल्यामुळे नवी मुंबई परिसरातील संभाव्य धोका कमी झाला आहे. अन्य जिल्हयात अशाप्रकारे कोणताही पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यास संबंधित प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन त्वरीत कार्यवाही करावी असे आदेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत 11 केंद्रीय सुरक्षा बलाच्या जवानांना कोरोनाची लागण झाली असून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.

दरम्यान, पनवेल परिसरात एकूण 15 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी एक जण बरा झाला आहे. सद्यस्थितीत पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे एकूण 14 रुग्ण आहेत. केंद्रीय सुरक्षा बलाच्या 11 जवानांपैकी एका जवानाला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात बंदोबस्त करत असताना कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या 11 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती पनवेलचे आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.