ठाणे : भिवंडी धामनकर नाक्यावरील जिलानी अपार्टमेन्ट या तीनमजली इमारतीचा काही भाग आज पहाटे तीनच्या सुमारास कोसळला. यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. त्यामध्ये एका चार वर्षांच्या चिमुरड्याचा जीव वाचवण्यात बचाव पथकाला यश मिळाले. उबेर कुरेशी असे या चिमुरड्याचे नाव आहे. याशिवाय इतर 10 नागरिकांनाही आतापर्यंत सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
पाच चिमुकल्यांसह दहा जणांचा मृत्यू..
उबेर नशीबवान असल्यामुळे वाचला असला, तरी इमारतीतील आणखी पाच मुले मात्र दुर्दैवी ठरली आहेत. या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी पाच लहान मुले आहेत.
मृत लहान मुलांची नावे पुढीलप्रमाणे..
- फायजा खुरेशी (५)
- आयशा खुरेशी (७)
- फातमा जुबेर बाबु (२)
- फातमा जुबेर कुरेशी (८)
- उजेब जुबेर (६)
दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे.