ETV Bharat / state

धक्कादायक..! भिवंडीत ३१ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

पीडित तरुणी भिवंडीतील कुरेशी नगरमधील एका इमारतीत राहते. त्यांच्याच मालकीची एक खोली शेजारच्या इमारतीतदेखील आहे. तीन महिन्यांपूर्वी तरुणी तिथे अंघोळीसाठी गेली असता, नराधम सादीन आणि खालीद यांनी तिच्यावर अत्याचार केला होता. भयभीत झालेल्या तरुणीने या घटनेची कुठेही वाच्यता केली नव्हती.

rape
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Nov 27, 2019, 7:39 PM IST

ठाणे - भिवंडी शहरातील कसाईवाडा येथे ३१ वर्षीय तरुणीवर दोघा नराधमांनी तीन महिन्यांपूर्वी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सादीन अंसारी (वय २५ ) आणि खालीद अंसारी अशी आरोपींची नावे आहेत. निजामपूर पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी भिवंडीतील कुरेशी नगरमधील एका इमारतीत राहते. त्यांच्याच मालकीची एक खोली शेजारच्या इमारतीतदेखील आहे. तीन महिन्यांपूर्वी तरुणी तिथे अंघोळीसाठी गेली असता, नराधम सादीन आणि खालीद यांनी तिच्यावर अत्याचार केला होता. भयभीत झालेल्या तरुणीने या घटनेची कुठेही वाच्यता केली नव्हती.

हेही वाचा - मुंबईत पोक्सो अंतर्गत बलात्काराच्या गुन्ह्यात वाढ; प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात खुलासा

दरम्यान, गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत मुलीच्या शारीरिक प्रक्रीयेत बदल झाल्याने तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, घडलेला प्रकार उघड झाला. मुलीच्या आईने मंगळवारी मुलीला निजामपूर पोलीस ठाण्यात नेऊन दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच निजामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांनी दोघा नराधमांना अटक करून बुधवारी ठाणे जिल्हासत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Intro:kit 319Body:भिवंडीत बलात्काराच्या घटनांचा कहर ; कसाईवाड्यात ३१ वर्षीय तरुणीवर गँगरेप

ठाणे : भिवंडी शहर परिसरात अल्पवयीन मुली व महिलांवर अमानूष अत्याचाराच्या घटनांनी कहर केलेला असतानाच कुरेशीनगर ,कसाईवाडा येथे ३१ वर्षीय तरुणीवर दोघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या घटनेप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात दोघा अत्याचारींच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. सादीन अंसारी ( २५ ) व खालीद अंसारी असे बलात्कार प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या नराधमांची नांवे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार भिवंडीतील कुरेशी नगरमधील राधाबाई बिल्डिंगमध्ये राहणारी पीडित तरुणी हि तिच्या कुटूंबियांसोबत शेजारच्याच घरात राहत आहे. मात्र तिच्या कुटुंबियांच्या मालकीची एका रूममध्ये हे नराधम राहत असलेल्या राधाबाई बिल्डिंगमध्ये पीडित तरुणी त्या बिल्डींगच्या बाथरूममध्ये तीन महिन्यांपूर्वी अंघोळीसाठी आली होती. त्यावेळी ती अंघोळ करून बाथरूममधून बाहेर निघत असताना नराधम सादीन आणि खालीद या दोघा नराधमांनी तिला बळजबरीने उचलून पुन्हा बाथरूममध्ये नेवून आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे पीडित तरुणी भयभीत झाली होती. त्यामुळे त्याने कुठेही वाचता केली नव्हती.

दरम्यान, या तीन महिन्यांच्या कालावधीत मुलीच्या शारीरिक प्रक्रियेत बदल झाल्याने आईने तिला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता घडलेला प्रकार मुलीने कथन केल्याने सामूहिक बलात्काराची घटना उघड झाली आहे. त्यामुळे भयभीत झालेल्या आईने मुलीला निजामपूर पोलीस ठाण्यात नेवून नराधम सादीन व खालीद या दोघांच्या विरोधात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच निजामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) शंकर इंदलकर यांनी दोघा नराधमांना अटक करून बुधवारी ठाणे जिल्हासत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Conclusion:bhiwandi
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.