ETV Bharat / state

बेरोजगारीला कंटाळून तरुणाची आत्महत्या; दुकानासमोर घेतला गळफास - suicides in thane

मीरारोडमधील नया नगर परिसरातील गुलशन इमारतीत एका बंद दुकानाबाहेर तीस वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली. गंगा कॉम्प्लेक्स परिसरात राहणारा हा युवक पाच महिन्यांपूर्वी दुबईहून परतला होता. युवकाचे नाव सलमान सय्यद असून त्याने बेरोजगारीमुळे गळफास घेतल्याचे वृत्त आहे.

thane crime news
बेरोजगारीला कंटाळून तरुणाची आत्महत्या; दुकानासमोर घेतला गळफास
author img

By

Published : Aug 18, 2020, 7:02 AM IST

Updated : Aug 18, 2020, 9:14 AM IST

ठाणे - मीरारोडमधील नया नगर परिसरातील गुलशन इमारतीत एका बंद दुकानाबाहेर तीस वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली. गंगा कॉम्प्लेक्स परिसरात राहणारा हा युवक पाच महिन्यांपूर्वी दुबईहून परतला होता. युवकाचे नाव सलमान सय्यद असून त्याने बेरोजगारीमुळे गळफास घेतल्याचे वृत्त आहे.

बेरोजगारीला कंटाळून तरुणाची आत्महत्या; दुकानासमोर घेतला गळफास
सलमान गेल्या पाच महिन्यांपासून सतत कामाच्या शोधात होता. मागील काही काळापासून बेरोजगारीमुळे तो नैराश्यात गेला होता. त्यामुळे रविवारी रात्रीच्या सुमारास घरापासून शंभर मीटरच्या परिसरात बंद दुकानाबाहेर त्याने गळफास लावून आत्महत्या केली.

नया नगर पोलिसांना स्थानिकांनी माहिती दिली. घटनास्थळी पोलीस अधिकारी दाखल होऊन त्यांनी युवकाचा मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर संबंधित मृतदेह शवविच्छेदनासाठी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात पाठवण्यात आलाय. युवकाच्या खिशात एका व्हिजिटिंग कार्डवर 'आई, बाबा, बहीण मला माफ करा,'आय एम अपसेट 'असे लिहिल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे.

Last Updated : Aug 18, 2020, 9:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.