ETV Bharat / state

आदिवासी महिलेचा विनयभंग करणाऱ्याला ३ वर्षांचा कारावास

भिवंडी तालुक्यात असलेल्या हिवाळी गावातील एका विधवा आदिवासी महिलेच्या घरात रात्रीच्या वेळी घुसून तिचा एका नराधमाने विनयभंग केल्याची घटना घडली होती.

आदिवासी महिलेचा विनयभंग करणाऱ्याला ३ वर्षांचा कारावास
author img

By

Published : Mar 31, 2019, 8:26 PM IST

ठाणे - भिवंडी तालुक्यात असलेल्या हिवाळी गावातील एकाविधवा आदिवासी महिलेच्या घरात रात्रीच्या वेळी घुसून तिचा एका नराधमाने विनयभंग केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी ठाणे जिल्हा सत्र व विशेषन्यायालयाने या नराधमाला दोषी ठरवतविनयभंग वअ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. प्रकाश अंधेरे (४२) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना २००८ ला गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती.

१९ ऑक्टोबर २००८ रोजी मध्यरात्री आरोपी प्रकाश महिलेच्या घरात शिरून त्याने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पीडिता तिच्या मुलांसोबत झोपलेली होती. अचानक घडलेल्या प्रसंगाने तिने आरडाओरड केल्याने आरोपीने घरातून पळ काढला होता. त्यावेळी पिडीतमहिला आणि तिच्या मुलाने आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र,तो त्यांच्या हातातूननिसटला. याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावा संकलित करून न्यायालयातदोषारोपपत्रदाखल केले होते. हा खटला विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी. पी. शिरसाठ यांच्या न्यायालयात चालवण्यात आला.

सरकारीवकील रेखा हिरावळे यांनी सादर केलेल्या पाच साक्षीदारांची साक्ष तसेच पोलिसांनी सादर केलेलेपुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने प्रकाश अंधेरे याला दोषी ठरलवून शिक्षा ठोठावली आहे. यामध्ये अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार ३ वर्षे कारावास व एक हजार रुपये दंड, विनयभंगप्रकरणी १ वर्ष कारावास आणि कलम ४५२ प्रकरणी ६ महिने कारावास आणि १ हजार रुपये दंड, अशा वेगवेगळ्या कलमान्वये शिक्षांचा समावेश आहे. या गुन्ह्याचा तपास गणेशपुरी विभागाचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी एच.ए. आव्हाड यांनी केला.

आदिवासी महिलेचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला तीन वर्षाचा कारावास

ठाणे :- भिवंडी तालुक्यातील हिवाळी गावातील विधवा आदिवासी महिलेच्या घरात रात्रीच्या वेळेस घुसून तिचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला ठाणे जिल्हा सत्र व विशेष न्यायालयाने दोषी ठरवत विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात तीन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. प्रकाश अंधेरे (४२) असे शीक्षा ठोठवण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे.  ही घटना २००८ साली गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवाळी गावात घडली होती.

भिवंडी तालुक्यातील हिवाळी गावाचा आरोपी रहिवाशी आहे. तर पीडित महिला आदिवासी समाजाची आहे. १९ ऑक्टोबर २००८ च्या मध्यरात्री आरोपी प्रकाश तिच्या घरात शिरून  तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पीडिता हि तिच्या मुलांसोबत झोपलेली होती. अचानक घडलेल्या प्रसंगाने तिने आरडाओरडीनंतर आरोपीने घरातून पळ काढला होता. त्यावेळी पिडीत महिला आणि तिच्या मुलाने आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो त्यांच्या हातातून निसटला. याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावा संकलित करून  न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी. पी. शिरसाठ यांच्या न्यायालयात चालवण्यात आला.  

दरम्यान, सरकारी वकील रेखा हिरावळे यांनी सादर केलेल्या पाच साक्षीदारांची साक्ष तसेच पोलिसांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने प्रकाश अंधेरे याला दोषी ठरवले व शिक्षा ठोठावली आहे. यामध्ये अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार तीन वर्षे कारावास व एक हजार रुपये दंड, विनयभंगप्रकरणी एक वर्ष कारावास आणि भादंवि कलम ४५२ प्रकरणी सहा महिने कारावास आणि एक हजार रुपये दंड अशा वेगवेगळ्या कलमान्वये शिक्षांचा समावेश आहे. या गुन्ह्याचा तपास गणेशपुरी विभागाचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी एच.ए. आव्हाड यांनी केला.

I’m protected online with Avast Free Antivirus. Get it here — it’s free forever.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.