ETV Bharat / state

नवी मुंबईत कोरोनाचे थैमान, एकाच दिवसात आढळले 24 रुग्ण - new corona positive cases in navi mumbai

गुरुवारी नवी मुंबईत एकाच दिवसात 24 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे, शहरातील नागरिकांची धाकधूक वाढली आहे. सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 230 इतकी आहे. गुरुवारी 13 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

नवी मुंबईत कोरोनाचे थैमान
नवी मुंबईत कोरोनाचे थैमान
author img

By

Published : May 1, 2020, 7:43 AM IST

नवी मुंबई - शहरात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढतच आहे. गुरुवारी नवी मुंबईत एकाच दिवसात 24 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे, शहरातील नागरिकांची धाकधूक वाढली आहे.

कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत कार्यरत असणाऱ्या नागरिकांना तिथेच राहण्याचे आवाहन मनपाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढल्याने शहराने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरात आत्तापर्यंत 241 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी आहेत.

आतापर्यंत 3 हजार 157 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 2 हजार 212 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून 715 जणांचे अहवाल येणे बाकी आहे. सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 230 इतकी आहे. गुरुवारी 13 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत 42 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

गुरुवारी 400 जणांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 376 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 24 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तुर्भेमधील 6, कोपरखैरणेमधील 7, घणसोलीमध्ये 1, ऐरोलीत 3, दिघ्यातील 4, असे एकूण 24 रुग्ण आढळून आले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. 24 रुग्णांमध्ये नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.