ETV Bharat / state

Thane Murder: २० वर्षीय चालकाची हत्या; मृतदेह लटकवला झाडाला, तर आरोपीचा शोध सुरू - 20 Year Old Youth Murder

Thane Murder: ठाणे शहरात एका २० वर्षीय टेम्पो चालकाची हत्या करून, त्याचा मृतदेह रेल्वे रुळानजीक असलेल्या एका झाडाच्या फांदीला लटकावून आरोपी फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Thane Murder
चालकाची हत्या
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 9, 2023, 11:00 PM IST

ठाणे Thane Murder: २० वर्षीय टेम्पो चालकाची हत्या केल्याची घटना भिवंडी तालुक्यातील ताडाली गावाच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात (Narpoli Police Station) अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सद्दाम कुरेशी (वय, २०, रा. कामतघर, भिवंडी ) असे हत्या झालेल्या चालकाचं नाव आहे.

झाडाला लटकवला मृतदेह: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक चालक सद्दाम भिवंडी शहरातील कमतघर भागात कुटूंबासह राहून एका टेम्पोच्या मालकाकडे चालक म्हणून काम करत होता. त्यातच नेहमीप्रमाणे (बुधवारी) ८ नोव्हेंबर रोजी मृतक सद्दाम हा टेम्पो घेऊन ठाणे शहरात गेला होता. त्यानंतर रात्रीच्या सुमारास ठाणे येथून परत येत असताना, रात्री १० वाजल्याच्या सुमारास भिवंडी रेल्वे स्थानकाहुन ताडाली मार्गे येत असताना कोणी तरी अज्ञात आरोपीने त्याला एका झाडाला फास लावून त्याचा मृतदेह लटकवला होता.

अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल : या घटनेची माहिती नारपोली पोलीस पथकाला मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर सद्दामचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयात रवाना केला. तर याप्रकरणी ताडाली गावात राहणारे शेतकरी जगन चौधरी (वय ६४) यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरोधात भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला.

आरोपीचा शोध सुरू : यासंदर्भात तपास अधिकारी पोलीस निरीक्षक (गुन्हे) समाधान चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, बुधवारी रात्रीच्या सुमारास चालक सद्दाम याला मारहाण करून रेल्वे रूळानजीक असलेल्या एका झाडा त्याचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. तर अनोखळी आरोपी फरार झाला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पोलीस पथक रवाना करण्यात आला आहे. लकवरच आरोपीला अटक करू असे त्यांनी सांगितलं. शिवाय मृतक सद्दामाचा व्हिसेरा (आतळी ) मुंबई येथील कलानी फॉरेनशी लॅबमध्ये पाठवण्यात आल्याचेही सांगितलं.

हेही वाचा -

  1. Thane Murder News: सासूने घरात येण्यास मज्जाव केल्यानं पतीकडून पत्नीची हत्या, सासूवर हातोडीनं हल्ला
  2. Father Killed Daughter: 'म्हणून' वडिलांनीच केला पोटच्या मुलीचा खून; कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का...
  3. Thane Murder News: 'या' संशयातून मालकानं केली कामगाराची हत्या, मृतदेह फेकला झाडाझुडपात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.