ETV Bharat / state

नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली ५ हजारच्या घरात

रविवारी 154 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 105 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. याशिवाय 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

154 more corona positive patient found in new mumbai
नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली ५ हजारच्या घरात
author img

By

Published : Jun 22, 2020, 2:33 PM IST

Updated : Jun 22, 2020, 3:03 PM IST

नवी मुंबई - शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यस्थितीत नवी मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा पाच हजारच्या घरात पोहोचला आहे. रविवारी 154 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 105 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. याशिवाय 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईमध्ये मागील 15 दिवसात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. हा वाढणारा आकडा प्रशासनाच्या चिंतेत भर टाकणारा आहे. आत्तापर्यंत नवी मुंबईत 4 हजार 852 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले असून यापैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. आत्तापर्यंत 16 हजार 953 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 11 हजार 385 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अद्याप 726 जणांचे तपासणी अहवाल प्रलंबित आहेत.

रविवारी नवे 154 रुग्ण आढळले. यात तुर्भेमधील 26, बेलापूरमधील 13, कोपरखैरणेमधील 40, नेरुळमधील 28, वाशीतील 17, घणसोलीमधील 18, ऐरोलीमधील 5, दिघ्यातील 7 रुग्णांचा समावेश आहे. नव्या रुग्णांमध्ये 46 स्त्रिया तर 108 पुरुष आहेत.

नवी मुंबईत रविवारी 105 जण कोरोनामुक्त झाले. यासह कोरोनामुक्तांचा आकडा 2 हजार 788 इतका झाला आहे. रविवारी बेलापूरमधील 3, नेरूळमधील 10, वाशीमधील 16, तुर्भेमधील 35, कोपरखैरणेमधील 14, घणसोलीमधील 8, ऐरोलीमधील 16, दिघामधील 3 जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये 55 स्त्रिया आणि 50 पुरुषांचा समावेश आहे.

शहरात सद्यस्थितीमध्ये 1 हजार 889 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी 7 जणांचा मृत्यू झाला, यासह मृत्यूचा आकडा 164 वर पोहोचला आहे.

हेही वाचा - उल्हासनगरमधील बेपत्ता वृद्धाची तारेने गळा आवळून हत्या; वसार गावाजवळ आढळला मृतदेह

हेही वाचा - ऐकावे ते नवलच... ‘मॅगी‘वरून पती-पत्नीत हाणामारी, पत्नीचा हात फ्रॅक्चर

Last Updated : Jun 22, 2020, 3:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.