ETV Bharat / state

धक्कादायक! खेळण्यासाठी मोबाईल न दिल्याने ११ वर्षीय मुलाची आत्महत्या

संतोष मांढरे यांचा मुलगा साहील काल दुपारी शाळेतून घरी आला असता त्याने वडिलांना खेळण्यासाठी मोबाईल मागितला. त्यावेळी वडिलांनी त्याला मोबाईल न देता 'अभ्यास कर, मोबाईलवर खेळू नकोस', असा दम दिला. त्यानंतर साहिलने रागाच्या भरात घरातील बाथरुमच्या खिडकीला नायलाॅनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

author img

By

Published : Nov 22, 2019, 5:51 PM IST

मृत साहिल मांढरे

ठाणे - वडिलांनी खेळण्यासाठी मोबाईल न दिल्याचा राग मनात धरून उल्हासनगर जवळील म्हारळ गावात ११ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साहिल मांढरे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव असून तो इय्यता ६वीत शिकत होता.

संतोष मांढरे यांचा मुलगा साहिल काल दुपारी शाळेतून घरी आला असता त्याने वडिलांना खेळण्यासाठी मोबाईल मागितला. त्यावेळी वडिलांनी त्याला मोबाईल न देता 'अभ्यास कर, मोबाईलवर खेळू नकोस', असा दम दिला. त्यानंतर साहिलने रागाच्या भरात घरातील बाथरुमच्या खिडकीला नायलाॅनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

दरम्यान, साहिलच्या शिक्षकाने पत्रकारांशी बोलताना सांगितले की, साहील हा खेळाडूवृत्तीचा आणि मनमिळावू स्वभावाचा विद्यार्थी होता. त्याचे या वयात जाणे ही मनाला वेदना देणारी बाब आहे. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Intro:kit 319Body:धक्कादायक ! वडिलांनी खेळण्यासाठी मोबाईल न दिल्याने ११ वर्षीय मुलाची आत्महत्या

ठाणे : वडिलांनी खेळण्यासाठी मोबाईल न दिल्याचा राग मनात धरून एका ११वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हि घटना उल्हासनगर नजीक असलेल्या म्हारळ गावात घडली आहे. साहील मांढरे (११) असे आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव असून तो इय्यता ६ वी वर्गात शिक्षण घेत होता.

मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर कॅम्प.नं. १ नजीक वसलेल्या म्हारळ गावात वास्तव्यास असलेले संतोष मांढरे यांचा मुलगा साहील मांढरे हा उल्हासनगर कॅम्प.नं.एक बस स्टॉप शेजारी असलेल्या महाराष्ट्र मित्र मंडळ विद्यालयात इय्यता ६ वी (अ) सेमी इंग्रजी माध्यममध्ये शिकत होता. काल दुपारी शाळेतून तो आपल्या घरी गेला होता. त्यावेळी त्याने घरात ठेवलेला वडिलांचा मोबाईल खेळण्यासाठी मागितला होता. त्यावेळी त्याला वडिलांनी मोबाईल न देता तु अभ्यास कर, मोबाईलवर खेळू नकोस, असा दम भरला. या गोष्टीचा राग साहील याला आला व त्याने रागाच्या भरात घरातील बाथरुमधील खिडकीला नायलनच्या दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
दरम्यान, साहीलच्या शिक्षकाने पत्रकारांशी बोलताना सांगितले की, साहील हा वर्गातील सर्वात खेळाडूवृत्तीचा व मनमिळावू स्वभावाचा विद्यार्थी होता. त्याचे या वयात जाणे ही मनाला वेदना देणारी बाब आहे. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Conclusion:ulhasnagar
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.