ETV Bharat / state

भिवंडीतील फ्लिपकार्डच्या गोदामात १ लाखांची चोरी

दोन्ही आरोपींनी या फ्लिपकार्ड कंपनीच्या गाळा नं. २२७ मधून मोबाईल संच, नामांकित कंपनीचे शूज, जीन्स पॅन्ट असा १ लाख ७७७ रुपयांच्या वस्तू चोरून त्यांची परस्पर विक्री केली. गोदामातील चोरीची घटना व्यवस्थापक अभिजित लक्ष्मण कदम (वय - २९, रा.ठाणे) यांच्या निदर्शनास आली.

narpoli police station, bhiwandi
नारपोली पोलीस ठाणे, भिवंडी
author img

By

Published : Dec 24, 2019, 7:49 PM IST

ठाणे - फ्लिपकार्ड कंपनीच्या गोदामातून मोबाईल, शूज, जीन्स पॅन्ट असा सुमारे एक लाखाहून अधिक किंमतीच्या वस्तू चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी तिथे काम करणाऱ्या 2 कामगारांनी संगनमताने केली. याप्रकरणी याप्रकरणी नारपोली पोलिसांनी या चोरट्या कामगारांना अटक केली आहे.

ही घटना भिवंडी तालुक्यातील गुंदवली येथील फ्लिपकार्ड कंपनीच्या गोदामात घडली आहे. ही कंपनी इंडियन कॉर्पोरेशनच्या कम्पाऊंडमधील अमेट टेक्नो लॉजिस्टिक कंपनी अंतर्गत चालवली जाते. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी या चोरट्या कामगारांना अटक केली आहे. कुणाल गणपत पाटील (वय - २४, रा.पहारे) आणि सदानंद बाबुनाथ म्हात्रे (वय - ३६, रा. हायवेदिवे) असे अटक केलेल्या कामगारांची नावे आहेत.

हेही वाचा - नाशिकमध्ये दामदुप्पटच्या नावाने लष्करी अधिकाऱ्यांना ४७ लाखांचा गंडा

दोन्ही आरोपींनी या फ्लिपकार्ड कंपनीच्या गाळा नं. २२७ मधून मोबाईल संच, नामांकित कंपनीचे शूज, जीन्स पॅन्ट असा १ लाख ७७७ रुपयांच्या वस्तू चोरून त्यांची परस्पर विक्री केली. गोदामातील चोरीची घटना व्यवस्थापक अभिजित लक्ष्मण कदम (वय - २९, रा.ठाणे) यांच्या निदर्शनास आली. यानंतर त्यांनी नारपोली पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. यानंतर पोलीस हवालदार अशोक बोडके यांनी दोन्ही आरोपींना अटक केली. आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना २७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Intro:kit 319Body:फ्लिपकार्ड गोदामातून एक लाखाचे मोबाईल ,शूज ,जीन्स पॅन्ट चोरणाऱ्या कामगारांना अटक

ठाणे : फ्लिपकार्ड कंपनीच्या गोदामात काम करणाऱ्या दोघा कामगारांनी संगनमताने मोबाईल ,शूज ,जीन्स पॅन्ट असा सुमारे एक लाखाहून अधिक किंमतीच्या वस्तू चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
हि घटना भिवंडी तालुक्यातील गुंदवली येथील इंडियन कॉर्पोरेशनच्या कम्पाऊंडमधील अमेट टेक्नो लॉजिस्टिक प्रा.लि.या कंपनी अंतर्गत असलेल्या फ्लिपकार्ड कंपनीच्या गोदामात घडली आहे. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी या चोरट्या कामगारांना अटक केली आहे. कुणाल गणपत पाटील ( २४ रा.पहारे ) व सदानंद बाबुनाथ म्हात्रे ( ३६ रा. हायवेदिवे ) असे अटक केलेल्या कामगारांची नांवे आहेत.
दोन्ही आरोपी कामगारांनी संगनमताने भिवंडी तालुक्यातील गुंदवली येथील इंडियन कंपाऊंडमधील फ्लिपकार्ड कंपनीच्या गाळा नं. २२७ मधून मोबाईल संच ,नामांकित कंपनीचे शूज ,जीन्स पॅन्ट असा १ लाख ७७७ रुपयांच्या वस्तू चोरून त्यांची परस्पर विक्री केली आहे. गोदामातील चोरीची घटना व्यवस्थापक अभिजित लक्ष्मण कदम ( २९ रा.ठाणे ) याच्या निदर्शनास येताच त्यांनी नारपोली पोलीस ठाण्यात दोघा कामगारांच्या विरोधात भादंवि.कलम ३८१,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल होताच पोलीस हवालदार अशोक बोडके यांनी चोरटे कामगार कुणाल व सदानंद या दोघांना अटक करून भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना २७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Conclusion:bhiwandi
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.